Saif Ali Khan Stabbing Case: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर नुकताच चाकू हल्ला झाला. सैफ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. ५ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सैफ अली खान घरी परतला आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरिफुल इस्लाम शहजाद उर्फ विजय दास (३०) याला पोलिसांनी अटक केली आहे. याचदरम्यान, या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनी दावा केला की पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केली आहे. इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना आरोपीचे वडील रुहुल अमीन म्हणाले की, सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती त्यांच्या मुलासारखी अजिबात दिसत नाही.

आरोपीच्या वडिलांचा दावा काय?

आरोपीचे वडील रुहुल अमीन यांनी सांगितलं की फुटेजमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे केस लांब आहेत, तर त्यांचा मुलगा शरीफुल याचे लहान आर्मी कट केस आहेत. “फुटेजमधील व्यक्तीचे केस खूप लांब आहेत, तर शरीफुल सहसा आर्मी कट करतो, तो त्याचे केस लहान ठेवतो,” असं अमीन म्हणाले. शरीफुलच्या वडिलांनी दावा केला की माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या मुलाने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाईक-रिक्षा चालवण्यास सुरुवात केली, असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, सैफ अली खानच्या घरातून पोलिसांना आढळलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळत आहेत. सैफ अली खानच्या ११ व्या मजल्यावरील अपार्टमेंमध्ये चढण्यासाठी आरोपीने वापरलेल्या डक्ट पाईपवरही ठसे आढळले आहेत.

सैफवर हल्ला करणार आरोपी शरिफुल ऊर्फ दास हा बांगला देशी घुसखोर असून त्याने मे महिन्यात बांगलादेश सीमेवरील डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर त्याने एका दलालाला दहा हजार दिले. त्या दलालाने त्याला आसामपर्यंत आणले आणि त्याला एक सिम कार्डही पुरवले. त्याच दलालाने त्याला कोलकात्याला जाण्यासाठी बसमध्ये बसवले. कोलकात्यात तीन दिवस राहिल्यानंतर आरोपीने मुंबईत येण्यासाठी रेल्वे पकडली. मुंबईत त्याने पुढील तीन दिवस इकडे तिकडे भटकून काढले. त्यानंतर त्याची ओळख जितेंद्र पांडे यांच्याशी झाली. पांडे याने त्याला वरळीतील एका पबमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून नोकरी लावली. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात काही दिवसातच चोरीच्या आरोपाखाली त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर तो चोऱ्या करू लागला. चोरी करण्यासाठीच तो सैफच्या घरात घुसला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan attacker father says photo of accused from cctv doesnt match to his son hrc