सैफ अली खान रुग्णालयात घरी परतला आहे. पाच दिवसांनी सैफला लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. गुरुवारी (१६ जानेवारीला) घरात घुसलेल्या दरोडेखोराने सैफवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या हल्ल्यानंतरचा सैफचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

करीना कपूर खान पतीला रुग्णालयात भेटण्यासाठी गेली होती. सैफ अली खानला आज डिस्चार्ज देण्यात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आता सैफ उपचारानंतर घरी परतला आहे. विरल भयानी व फिल्मीज्ञानने त्याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये सैफ वांद्रे येथील ज्या घरात त्याच्यावर हल्ला झाला, त्याच घरी परतताना दिसत आहे.

Walmik Karad News
Walmik Karad : वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुलेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल; सोशल मीडियावर रंगल्या ‘या’ चर्चा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”
Gautam Adani on son Jeet Adani Diva Jaimin marriage
Gautam Adani Video : मुलाच्या लग्नात सेलिब्रिटिंचा महाकुंभ गोळा होणार का? गौतम अदाणीचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…
Suresh Dhas on Viral CCTV FOotage
Suresh Dhas : वाल्मिक कराडच्या ‘त्या’ सीसीटीव्ही फुटेजवर सुरेश धसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “माझे आरोप…”
Digital arrest scammer
शेअर मार्केटमधून ५० लाखांचे ११ कोटी कमावले; डिजिटल अरेस्ट स्कॅममध्ये सगळे गमावले
Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागातले सर्वाधिक संशयित!
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता

सैफने जीन्स व पांढरे शर्ट घातले आहे. त्याच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे. सैफ पोलीस बंदोबस्तात घरी पोहोचला. पोलिसांनी त्याला घरी सुरक्षित सोडलं. यावेळी सैफला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

पाहा व्हिडीओ –

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ ​​विजय दास (३०) याला पोलिसांनी रविवारी ठाण्यातून अटक केली. त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसखोरी केल्याची कबुली दिली. आरोपी सात महिन्यांपूर्वी डौकी नदी ओलांडून भारतात आला होता. नंतर तो पश्चिम बंगालमध्ये गेला आणि तिथे काही आठवडे राहिला. सिमकार्ड मिळविण्यासाठी त्याने तेथील रहिवाशाचे आधार कार्ड वापरले. तिथून मग तो नोकरीच्या शोधात मुंबईला आला. इथे आल्यावर ज्याठिकाणी कागदपत्रे लागत नाही, अशा ठिकाणी तो काम करू लागला. अमित पांडे या कंत्राटदाराने त्याला वरळी आणि ठाणे येथील पब आणि हॉटेलमध्ये काम मिळवून दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इंडियन एक्सप्रेसने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या इमारतीत घुसण्याआधी आरोपीने इतर बॉलीवूड स्टार्सच्या बंगल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आलं नाही. कुत्रे भुंकल्याने तो तिथून पळून जाताना काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader