बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याच्या हटके चित्रपटातून प्रेक्षकांचं भरपुर मनोरंज केलं आहे, नुकतीच त्याच्या प्रकृतीबद्दल नवीन माहिती समोर आली होती. सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास त्याला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.
अभिनेत्याच्या खांद्यालाही फ्रॅक्चर झाल्याचे स्पष्ट झाले होते. सैफसोबत त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान देखील रुग्णालयात उपस्थित होती. सैफच्या गुढग्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले असल्याचं स्पष्ट झालं. डॉक्टरांनी कालपर्यंत काहीच माहिती देण्यास नकार दिला होता. अशातच नुकतंच सैफला डिस्चार्ज देण्यात आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आणखी वाचा : मुस्लिम कुटुंबियाचा ‘रामायण’ फेम अरुण गोविल यांच्यासह फोटो काढतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले…
रुग्णालयातून बाहेर पडत असताना त्याने मीडियाशी संवाद साधला अन् आपल्या तब्येतीविषयी माहितीही दिली. ‘झुम’शी संवाद साधताना सैफ म्हणाला, “माझ्या गूढग्यावर शस्त्रक्रिया झालेली नाही किंवा माझ्या पाठीला दुखापत झालेली नाही. अशा बऱ्याच अफवा समोर येत आहेत. माझ्या मनगटाला दुखापत झाली होती अन् गेले बरेच दिवस मी त्यावर उपचार घेत आहे. कधी कधी वेदना ह्या फारच होतात त्यामुळे रुग्णालयात यावं लागतं.”
पुढे सैफ म्हणाला, “हे नेमकं किती गंभीर आहे ते मलाही माहीत नाही. ‘देवारा’च्या चित्रीकरणादरम्यान मला ही दुखापत झाली. तेव्हा मला काहीच जाणवलं नाही, पण कालांतराने हे दुखणं वाढलं. त्यामुळेच डॉक्टरांनी मला तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आता शस्त्रक्रिया पार पडली आहे आणि डॉक्टरांच्या परवानगीने कामदेखील करू शकतो. चित्रपटाचं चित्रीकरण बरंच पूर्ण झालं आहे त्यामुळे मी आता एक महिना सुट्टीवर आहे अन् यामुळेच मी आता ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.”
ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली नसती तर सैफला त्याचा हात गमवावा लागला असता हा खुलासाही त्याने मीडियाशी संवाद साधताना केला. ‘देवारा’मध्ये सैफ अली खान ज्युनिअर एनटीआरसह झळकणार आहे. या चित्रपटात सैफ ‘भहीरा’ हे पात्र साकारणार आहे. तसेच याबरोबरच या चित्रपटाच्या माध्यमातून जान्हवी कपूरही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.