Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसलेल्या माणसाने चाकूचे वार केले. ज्यामुळे सैफला सहा जखमा झाल्या. त्याची शस्त्रक्रियाही पार पडली. सैफ अली खानला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर तो आराम करतो आहे. मात्र या घटनेने बॉलिवूड हादरलं आहे. विविध सेलिब्रिटींनी सैफला लवकर आराम मिळावा म्हणून प्रार्थना केली आहे, काळजी घेण्यासंबंधीच्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. मात्र सैफ हा पहिला कलाकार नाही की ज्याच्यावर हल्ला झाला आहे. याआधीही अनेक कलाकारांवर अ हल्ले झाले आहेत. आपण जाणून घेऊ त्या कलाकारांबाबत. कॉमेडियन, दिग्दर्शक, अभिनेत्री अशा सगळ्यांवरच हल्ला झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

गुलशन कुमार यांची खंडणीसाठी हत्या

या यादीत पहिलं नाव येतं ते गुलशन कुमार यांचं. १९९७ मध्ये गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यांना ठार करण्यात आलं. टी सीरिजचं साम्राज्य उभं करणाऱ्या गुलशन कुमार यांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला होता. मुंबईतल्या अंधेरी भागात शिव मंदिराजवळ त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गुलशन कुमार यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने ही घटना घडली होती.

Shopkeeper shot dead in Mira Road
मिरा रोड गोळीबार प्रकरण : ११ दिवसानंतरही हल्लेखोर फरार
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Manoj Jarange Patil Dhananjay Munde
“वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र”, मनोज जरांगेंचा थेट आरोप; म्हणाले, “जातीचं पांघरून…”
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी खरं सांगत नसतील तर त्यांना…”, बजरंग सोनावणेंचं वक्तव्य
sajid khan on me too allegation on him
“सहा वर्षांत अनेक वेळा स्वतःला संपवण्याचा…”, MeToo प्रकरणात आरोप झालेल्या बॉलीवूड दिग्दर्शकाने केला खुलासा; म्हणाला…
Rape in surat
शेअरचॅटवरील मित्राला मुंबईत भेटायला आली अन् नराधमानं गाठलं, पाच तासांत तीनवेळा बलात्कार; न्यायालयाने सुनावली कठोर शिक्षा

राकेश रोशन यांच्यावर दोनवेळा गोळीबार

कहो ना प्यार है हा सिनेमा सुपरहिट झाल्यानंतर राकेश रोशन यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. खंडणीचे पैसे द्यायला नकार दिल्याने राकेश रोशन यांच्यावर दोनदा गोळीबार झाला पण ते या हल्ल्यातून कसेबसे वाचले.

शाहिद कपूर आणि इर्फान यांच्यावर कोळसे फेकले गेले

२०१४ मध्ये हैदर या सिनेमाचं चित्रीकरण करताना शाहिद कपूर आणि इर्फान या दोन कलाकारांवर जमावाने कांगडी अर्थात निखारे फेकले होते. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि या दोन कलाकारांना वाचवलं.

गौहर खानला थोबाडीत ठेवून देण्यात आली

२०१४ मध्ये गौहर खान ही अभिनेत्री एका कार्यक्रमासाठी स्टेजवर गेली होती. गौहर खानने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत एका पुरुषाने स्टेजवर येऊन गौहरला थोबाडीत ठेवून दिली होती. ज्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता.

संजय लीला भन्साळींना करणी सेनेने मारलं

२०१८ मध्ये संजय लीला भन्साळी यांचा पद्मावत हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. त्यावेळी वाद निर्माण झाला होता. करणी सेनेने राजपूत समाजाच्या अपमानाचा मुद्दा उपस्थित करुन संजय लीला भन्साळींवर हल्ला केला होता. संजय लीला भन्साळी यांच्या शुटिंग युनिट आणि कलाकरांसमोर त्यांना थोबाडीत ठेवून देण्यात आली होती.

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार

सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून ठार करण्याच्या धमक्या अनेकदा आल्या आहेत. तसंच एप्रिल २०२४ मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी या अपार्टमेंटमध्ये असलेल्या घराच्या बाहेर काही लोकांनी गोळीबार केला होता. ज्यानंतर सलमान खानने गॅलरीलाही बुलेट प्रुफ काच लावून घेतली अशी माहिती समोर आली होती.

रवीना टंडनला मारण्याचा प्रयत्न, महिलांनी केली बडबड

काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री रवीना टंडन तिच्या कारमध्ये बसली होती आणि कारचालक कार तिच्या इमारतीच्या आतमध्ये घेऊन चालला होता. त्यावेळी दोन महिलांनी तिची कार थांबवली आणि गाडीच्या बाहेरुन रवीनाला मारण्याचा प्रयत्न केला. रवीना जेव्हा कारच्या बाहेर आली तेव्हा तिच्यावर आरडाओरडा सुरु करण्यात आला. रवीनाने त्या बायकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्या अद्वातद्वा बोलत राहिल्या. रवीनाने या प्रकरणांत पोलिसांत तक्रार केली नाही. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

सुनील पालचं पैशांसाठी अपहरण

काही दिवसांपूर्वी सुनील पाल शो साठी गेले आणि बेपत्ता झाले होते. खंडणीसाठी त्यांचं काही काळासाठी अपहरण करण्यात आलं होतं. कसाबसा जीव वाचवून सुनील पाल मुंबईत परतले. सुनील पाल यांना त्यासाठी पैसे मोजावे लागले ज्यानंतर त्यांना सुटून मुंबईत येता आलं. अशा घटना बॉलिवूडच्या कलाकरांबाबत अनेकदा घडल्या आहेत. आज रझा मुराद यांनीही खंडणीसाठी धमक्या येत असल्याची बाब बोलून दाखवली तसंच या प्रकरणात कुणीही फारसं पुढे जात नाही. खंडणी देऊन लोक मोकळे होतात. याआधीही अशा घटना घडल्या आहेत.

Story img Loader