Saif Ali Khan House Help Video: अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील, वांद्रे (पश्चिम) येथील घरी दरोडेखोराने दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. सैफ व दरोडेखोर यांच्यात झटापट झाली, याचदरम्यान त्याने चाकूने वार केले, ज्यामुळे सैफ अली खान गंभीर जखमी झाला. सैफ अली खानला हात व मणक्याला दुखापत झाली. सैफबरोबर तिथे त्यांची मदतनीसदेखील होती. या हल्ल्यात मदतनीसदेखील जखमी झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सैफ अली खान जखमी झाल्यावर मदतनीसने इब्राहिम अली खान व कुणाल खेमू यांना या घटनेची माहिती दिली. इब्राहिम तात्काळ रिक्षाने सैफच्या घरी पोहोचला आणि त्याला रिक्षातून रुग्णालयात नेलं. तर, कुणाल जखमी मदतनीसला कारने रुग्णालयात घेऊन गेला. सैफ अली खान व करीना कपूर यांच्या जखमी मदतनीसचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर

फिल्मीज्ञान या पापाराझी अकाउंटवरून सैफच्या घरातील मदतनीसचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत तिच्या हाताला पट्टी बांधलेली दिसत आहे. तसेच तिच्या कपड्यांवर रक्ताचे रक्ताचे थेंब उडाल्याचे डाग दिसत आहेत. ही घटना घडली तेव्हा करीना, सैफ व त्यांची मुलं तैमूर व जेह घरातच होते. मुलं व बायकोला वाचवण्यासाठी सैफ या दरोडेखोराशी भिडला. त्यावेळी सैफबरोबरच ही मदतनीसदेखील जखमी झाली.

हेही वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या

पाहा व्हिडीओ –

सैफबरोबर या मदतनीसला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिला किरकोळ दुखापत झाल्याने उपचारानंतर तिला घरी सोडण्यात आलं. पण सैफच्या मणक्याला व हाताला गंभीर जखमा झाल्या आहे. त्याच्या मणक्यात चाकूचे टोक घुसले होते, त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर सैफला रिकव्हरी रुममध्ये हलवण्यात आलं.

हेही वाचा – चोराने सैफवर हल्ला केल्यावर ‘हे’ दोघे पोहोचले मदतीला; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात

सैफला लीलावती रुग्णालयात भेटण्यासाठी त्याची मुलं सारा अली खान व इब्राहिम, करीना कपूर, रणबीर कपूर, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद, सोहा अली खान व तिचा पती कुणाल खेमू, करिश्मा कपूर, तसेच करीनाचे आई वडील बबिता व रणधीर कपूर गेले होते.

हेही वाचा – ५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपीचा पहिला फोटो पोलिसांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत आरोपी पायऱ्यांवरून खाली उतरताना दिसत आहे. रात्री २ वाजून ३३ मिनिटांनी तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. पोलिसांची १० पथकं या आरोपीचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan house help injured in attack watch video hrc