Saif Ali Khan Attack News Saba Pataudi Shares health updates : सैफ अली खानवर वांद्रे ( पश्चिम ) येथील राहत्या घरी दरोडेखोराने चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री अभिनेत्याच्या घरी दरोडेखोर शिरला होता. यावेळी आपल्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी सैफने चोराचा सामना केला. यावेळी अभिनेत्याकडे स्वत:चा बचाव करण्यासाठी काहीच नव्हतं. मध्यरात्री २.३० च्या सुमाराच या चोराने सैफवर चाकूने वार केल्याची घटना घडली.

लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. निरज उत्तमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे ३.३० च्या सुमारास इब्राहिम अली खान आणि सैफच्या घरचे कर्मचारी त्याला रुग्णालयात घेऊन आले. यानंतर डॉक्टरांच्या टीमकडून अभिनेत्यावर उपचार करण्यास सुरुवात झाली. या हल्ल्यानंतर मनोरंजन विश्वातील सैफची मित्रमंडळी व चाहते चिंतेत पडले होते. यामुळे सैफ-करीनाच्या टीमने अभिनेत्यावर उपचार सुरू असून, याप्रकरणी मीडिया व चाहत्यांनी संयम बाळगावा, घरातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. अशी माहिती गुरुवारी सकाळी दिली होती. आता अभिनेत्यावरची शस्त्रक्रिया पार पडली असून सैफबद्दलची हेल्थ अपडेट त्याची मोठी बहीण सबा पतौडी हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली आहे.

shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Shashi Tharoor on Nitesh Rane
नितेश राणेंच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून शशी थरूर यांचा संताप; म्हणाले, “या लोकांना…”
Aamir Khan
“या सीनला लोक…”, ‘दिल’ चित्रपटाच्या वादग्रस्त सीनवरून आमिर खानचे दिग्दर्शकाशी झालेले मतभेद
sana khan welcomes second baby boy
धर्मासाठी बॉलीवूड सोडणारी सना खान दुसऱ्यांदा झाली आई, दीड वर्षांचा आहे पहिला मुलगा
Junaid Khan And Reena Dutta
आमिर खानच्या मुलाला होता ‘हा’ आजार; ‘तारे जमीन पर’ची स्क्रीप्ट ऐकल्यानंतर झालेली जाणीव, जुनैद खानचा खुलासा

हेही वाचा : Saif Ali Khan Attacked : “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग?”, जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केली गंभीर शंका

“सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली असून त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाहीये. सध्या त्याच्यावर पुढील उपचार सुरू असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातले सगळे सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. आम्ही डॉ. निरज उत्तमानी, डॉ. नितीन डांगे, लीना जैन आणि लीलावती रुग्णालयातील संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छितो. चाहत्यांनी व हितचिंतकांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल खूप खूप आभार…” असं सबाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शस्त्रक्रिया पार पडल्यावर सैफ अली खानची भेट घेण्यासाठी सारा अली खान, इब्राहिम अली खान, पत्नी करीना कपूर असे सगळेजण लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत.

Story img Loader