Saif Ali Khan Home : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. मुंबईतील पॉश एरिया असलेल्या वांद्रे येथील त्याच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. दरोडेखोराबरोबर झालेल्या झटापटीत त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे सैफला सहा जखमा झाल्या. आज (१६ जानेवारी) घडलेल्या या घटनेने मुंबईतील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाहेरची व्यक्ती सैफच्या घरात सुरक्षा असूनही कशी घुसली, याबाबत पोलीस तपास करत आहेत. सैफ व करीनाच्या ज्या घरात ही घटना घडली, ते घरं नेमकं कसं आहे, त्याची किंमत किती आहे, याबाबत जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरोडेखोरांनी हल्ला केला तेव्हा सैफ, करीना व त्यांची मुलं तैमूर आणि जेह घरातच होते. सैफच्या घरातील इतर सदस्य सुरक्षित आहेत. सैफ व त्याची मदतनीस या हल्ल्यात जखमी झाले.

सैफने २०१२ मध्ये घेतलं घर

बॉलीवूडचे पॉवर कपल सैफ व करीना मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. त्यांचे घर सतगुरु शरण या १२ मजली उंच इमारतीत आहे. सैफ अली खानने २०१२ मध्ये २३.५९ रोटी रुपयांमध्ये सतगुरु बिल्डर्सकडून हे घर विकत घेतले होते. ६५०८ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या आलिशान घरामध्ये पाच बेडरूम, एक जिम, एक म्युझिक रूम आणि सहा बाल्कनी आहेत. कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखसोयीनुसार हे घर तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा – हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय; दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…

सैफ-करीनाच्या या आलिशान घरात एक मोठं छत आणि स्विमिंग पूलही आहे. या घराचे नूतनीकरण करण्यासाठी चार वर्षे लागली होती. या इमारतीत चार मजल्यांवर सैफचे घर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खान सध्या ज्या घरात राहतो तिथे प्रॉपर्टीची किंमत ७० हजार रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. येथील आजूबाजूच्या भागात जमिनीची किंमत ५० ते ५५ हजार रुपये प्रती स्क्वेअर फूट आहे.

हेही वाचा – “कुटुंबातील इतर सदस्य…”, पती सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याबद्दल करीना कपूरची पहिली प्रतिक्रिया

सैफ अली खान आणि करीना कपूर खान याआधी वांद्रे येथील चार मजली फॉर्च्यून हाइट्स कॉम्प्लेक्समध्ये राहत होते. त्यानंतर ते वांद्रे येथील सतगुरु शरण या इमारतीत राहायला आले. त्यांचे आधीचे घर तीन हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले होते. त्या घराची किंमत २०१३ मध्ये ४८ कोटी रुपये होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan kareena kapoor bandra apartment in satguru sharan building swimming pool music room hrc