बॉलीवूडचे कलाकार हे सातत्याने चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, कधी चित्रपटांतील भूमिका, तर कधी त्यांनी केलेली वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेता सैफ अली खानने एका मुलाखतीत त्याच्या मुलांबद्दल वक्तव्य केल्याने सध्या तो चर्चेत आहे. त्याला सारा, इब्राहिम, तैमूर व जेह अशी चार मुले आहेत.

काय म्हणाला सैफ अली खान?

अभिनेता सैफ अली खानने नुकतीच ‘इंडिया टुडे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आपल्या मुलांबद्दल बोलताना म्हटले, “मला प्रत्येकाबरोबर वेळ घालवायला आवडते. मी अभिनय क्षेत्रात आहे. म्हणून त्यांनीदेखील याच क्षेत्रात काम करावे, असा कोणत्याही प्रकारचा त्यांच्यावर दबाव नाही. सारा आणि इब्राहिमने तर हे केलेच आहे. मला वाटते की, अभिनय क्षेत्रात काम करणे उत्तम आहे. तरी मी त्यांच्यावर तसा कोणत्याही प्रकारचा दबाव निर्माण करीत नाही.”

Gashmeer Mahajani
“परत तिच्या कुशीत…”, गश्मीर महाजनी आईबद्दल बोलताना म्हणाला, “घरी दोन लहान मुलं…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

सैफ अली खान पुढे बोलताना म्हणतो, “माझी दोन मोठी मुले आधीपासूनच अभिनय क्षेत्रात काम करीत आहेत किंवा करतील. तैमूरने मला एकदा सांगितले होते की, लोकांसमोर पाठ केलेल्या ओळी बोलून दाखवण्याचा विचार मला सहन होत नाही. त्यावर मी त्याला म्हटलं, मी पूर्णत: समजू शकतो. आता तो मला सांगतो की, तो शाळेत सादर होणाऱ्या नाटकांची वाट पाहत आहे. जो लहान मुलगा आहे, तो जेह जन्मत: कलाकार आहे. तुम्ही ते बघू शकता आणि मला माहीत आहे की, ते त्याच्याकडे कुठून आलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. जर ते आनंदी राहणार असतील, तर ते शाळेतील शिक्षकदेखील होऊ शकतात.”

सैफ अली खानने मुलांना सल्ला देण्याविषयी बोलताना म्हटले, “मी मुलांवर आयुष्यात एक विशिष्ट प्रकारचा दबाव टाकू इच्छित नाही.” त्याची मुले त्याच्याकडे सल्ल्यासाठी येतात का, असे विचारले असता सैफ म्हणाला, “मी सध्या चित्रपटाचे शूटिंग करीत नाही. त्यामुळे मी माझा बहुतांश वेळ माझ्या मुलांसोबत घालवतो. महत्त्वाचे म्हणजे ते मला सल्ला विचारण्यासाठी येतात. मी भाग्यवान आहे की, त्यांना माझे मत जाणून घ्यायचे असते. माझ्यासाठी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवणे महत्त्वाचे आहे.”

हेही वाचा: “करिअरच्या सुरुवातीलाच मुलीने केलेली फसवणूक…”, अरबाज पटेल संघर्षाच्या काळाबद्दल सांगताना म्हणाला, “वडिलांचा अपघात आणि आईचे सोने गहाण…”

सैफची मुलगी सारा अली खानने २०१८ मध्ये केदारनाथ या चित्रपटातून पदार्पण केले. तर, करण जोहर निर्मित आणि काजोलची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात इब्राहिम दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. तो खुशी कपूरबरोबरही दिसणार आहे.

दरम्यान, सारा आणि इब्राहिम हे अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुले आहेत. सैफ अली खानने अमृता सिंगबरोबर १९९१ साली पहिले लग्न केले होते. २००४ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. करीना कपूर व सैफ अली खान यांनी २०१२ साली लग्न केले आणि त्यांना तैमूर व जेह ही दोन मुले आहेत. हे संपूर्ण कुटुंब अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करीत असल्याचे पाहायला मिळते.

Story img Loader