Saif Ali Khan Picks Brave laders in India for Better Future : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. सैफ म्हणाला, राहुल गांधींनी खूप मेहनत करून त्यांची जनमाणसातील प्रतिमा बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी व आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यापैकी साहसी नेता कोण आहे जो भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाईल? असा प्रश्न सैफला विचारण्यात आला. यावर क्षणाचाही विलंब न करता सैफने राहुल गांधींचं नाव घेतलं आणि त्यांचं तोंडभरून कौतुकही केलं. सैफ समाजमाध्यमं व प्रसारमाध्यमांपासून दूर राहतो. मात्र गुरुवारी त्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याची राजकीय मतं मांडली.

सैफ अली खान गुरुवारी सायंकाळी इंडिया टूडे कॉन्क्लेव्ह २०२४ मध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याला देशातील सर्वात धाडसी व इमानदार राजकीय नेता कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने राहुल गांधींचं नाव घेतलं आणि म्हणाला, पूर्वी काही लोक राहुल गांधींचा अनादर करत होते. मात्र राहुल गांधी यांनी मोठ्या कष्टाने लोकांची मनं जिंकली आहेत.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sharad Pawar on RSS Cadre
Sharad Pawar on RSS: शरद पवारांकडून RSS ची स्तुती; संघासारखे केडर निर्माण करण्याची गरज का व्यक्त केली?
Sanjay Raut on MVA
Sanjay Raut on MVA: महाविकास आघाडी फुटली का? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले, “आम्ही भाजपामध्ये असताना…”
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे ते अजित पवारांचे विश्वासू; धनंजय मुंडेंचा असा आहे राजकीय प्रवास
Former Shiv Sena MLA Uddhav Thackeray Sanjay Ghatge is on the way to join BJP
कागलमध्ये घाटगे विरुद्ध घाटगे
thackeray group in Ahmednagar facing tough situation
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती

हे ही वाचा >> Emergency : भिंद्रनवाले-संजय गांधींमधील संवाद ते शिखेतरांवरील…, कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात CBFC ने सुचवले ‘हे’ आठ बदल

देशातील लोकशाही अद्याप जिवंत : सैफ अली खान

बॉलिवूड अभिनेता म्हणाला, मला वाटतं की राहुल गांधींनी जे काही केलंय ते खूप प्रभावशाली आहे. कारण एक काळ असा होता जेव्हा लोक त्यांच्या व त्यांच्या वक्तव्यांचा अनादर करायचे. मात्र त्यांनी खूप कष्टाने जनमाणसातील स्वतःची प्रतिमा बदलली आहे. मी कोणाचं समर्थन करतो यावर मला बोलायचं नाही. कारण मी अराजकीय व्यक्ती आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की देशातील जनतेने अगदी ठळकपणे त्यांचं मत मांडलं आहे. भारतात अजूनही लोकशाही जिवंत आहे आणि ती अजून मजबूत होत असल्याचं पाहून मी आनंदी आहे.

हे ही वाचा >> Emergency : भिंद्रनवाले-संजय गांधींमधील संवाद ते शिखेतरांवरील…, कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात CBFC ने सुचवले ‘हे’ आठ बदल

सैफ अली खान राजकारणात येणार?

सैफ म्हणाला, “मी काही राजकारणी नाही आणि मला राजकारणात यायचं नाही. तसेच मला राजकीय विश्लेषकही व्हायचं नाही. कारण माझ्याकडे त्याबद्दलची मजबूत विचारसरणी नाही, तशा भूमिका मी कधी घेतल्या नाहीत. मी तुम्हा पत्रकारांबद्दल बोलतोय. कारण तुम्ही राजकीय पत्रकार माझ्यापेक्षा खूप धाडसी आहात. मात्र, राजकीय वक्तव्ये करून मला ती लोकप्रियता मिळवायची नाही. मला तसं काही हवं असतं तर मी एखाद्या राजकीय पक्षात प्रवेश केला असता. परंतु, मी त्यासाठी तयार नाही.

Story img Loader