सैफ अली खान हा बॉलीवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे. सैफ त्याच्या चित्रपटांमुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असतो, पण त्याचं वैयक्तिक आयुष्यही खूप फिल्मी राहिलं. सैफने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्याच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या अमृता सिंहशी लग्न केलं होतं. ‘कॉफी विथ करण’च्या ताज्या भागात सैफने आई व ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर हजेरी लावली. यावेळी त्याने लग्नाचा निर्णय का घेतला होता व आता त्याचं अमृताशी नातं कसं आहे, याबाबत भाष्य केलं.

गप्पा मारताना करणने सैफला विचारलं की इतक्या लहान वयात त्याने लग्न का केले होते. त्यावर सैफ म्हणाला की लग्न करणं हे काहिसं घरातून पळून जाण्यासारखं होतं. “मला त्यावेळी वाटलं होतं की ही एक प्रकारची सुरक्षितता होती. तेव्हा मला ते सगळं खूप छान वाटत होतं आणि मला वाटलं की लग्न करून मी स्वतःचं एक घर बनवू शकेन.”

Supriya sule on dhonde jevan
“मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडिलांना पाय धुवायला लावू नका, त्याऐवजी…”, धोंडी जेवणाबाबत सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती!
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Sambhaji Nagar Accident
“रील बनवताना मृत्यू नाही, माझ्या बहिणीची सुनियोजित हत्या”, बहिणीचा गंभीर दावा; म्हणाली, “३०-४० किमी लांब येऊन…”
Boyfriend Stabs Girlfriend
“…तर आरती यादव वाचली असती”, पोलिसांवर आरोप करत पीडितेच्या आई-बहिणीने फोडला टाहो
love jihad hindu woman victime
‘बाळाचे नाव मुस्लीम धर्मावरून ठेवणार नाही’, सासरच्या मंडळीना विरोध करताच सूनेचा छळ
Yuvraj Goyal
भारतीय तरुणाची कॅनडात गोळ्या झाडून हत्या, पोलिसांनी चार संशयितांना घेतलं ताब्यात!
What Ajit Pawar Said?
Porsche Accident: “मुलाच्या बापाला, बापाच्या बापाला अटक केली, आम्ही..”; अजित पवारांची प्रतिक्रिया
Crime Bihar
आध्यात्माच्या शोधात घरातून पळालेल्या तीन अल्पवयीन मैत्रीणींचा मृत्यू; अज्ञात ‘बाबा’च्या निरोपानंतर पलायन

सैफ अली खानने १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहशी गुपचूप केलेलं लग्न; आई शर्मिला टागोर यांना कळताच…, स्वतःच केला खुलासा

सैफ आणि अमृता सारख्या स्वभावाचे होते असं शर्मिला म्हणाल्या. दोघांनी लग्न केलं तेव्हा ते एकत्र खूप आनंदी दिसत होते, पण दुर्दैवाने १३ वर्षांनी ते विभक्त झाले. “दुर्दैवाने २० व्या वर्षी लग्न केलं तेव्हा मी खूप तरुण होतो. लग्नानंतर गोष्टी बदलतात. ती माझ्याशी खूप छान वागायची. ती माझ्या दोन मुलांची आई आहे. माझे तिच्याशी चांगले संबंध आहेत आणि मी तिचा खूप आदर करतो,” असं सैफ त्याच्या लग्नाबद्दल आणि पहिली पत्नी अमृताबद्दल म्हणाला.

Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित

दरम्यान, सैफ आणि अमृताने १९९१ मध्ये लग्न केलं होतं आणि १३ वर्षांनी २००४ ते विभक्त झाले होते. त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन अपत्ये आहेत. सैफचं त्याच्या दोन्ही मुलांशी खूप छान नातं आहे. सैफने नंतर २०१२ साली करीना कपूरशी लग्न केलं. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन मुलं आहेत. इब्राहिम व सारा आईबरोबर राहतात, पण अनेकदा सण व उत्सव साजरे करण्यासाठी ते सैफच्या घरी जातात.