Saif Ali Khan stabbing suspect new Photo: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा संशयित मुंबईतील वांद्रे येथे दिसल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्यावर हल्ला केल्यानंतर तो वांद्रे येथे दिसला. संशयिताने सैफ अली खानवर हल्ला केला, त्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो काळा टी-शर्ट घालून होता, पण आता नवीन फोटोमध्ये तो निळा शर्ट घातलेला दिसत आहे.

सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. सैफ व करीनाच्या घरातील स्टाफची देखील चौकशी करण्यात आली. तसेच रिनोव्हेशनचं काम करणाऱ्यांनाही चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं. तपासादरम्यान सैफच्या घराजवळील आणि वांद्रे येथील हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात हल्लेखोर निळा शर्ट घालून आणि बॅकपॅक घेऊन फिरताना दिसत आहे. संशयिताला अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही. फोटोत दिसणारा संशयित सकाळी ८ वाजेपर्यंत वांद्र्यात होता, अशी माहिती इंडिया टुडेने दिली आहे.

हेही वाचा – “किती वेळ लागेल”, जखमी सैफ अली खानने रिक्षा चालकाला विचारलेला प्रश्न; म्हणाला, “खूप रक्तस्त्राव…”

५४ वर्षीय सैफवर गुरुवारी मध्यरात्री २ वाजता घरात घुसलेल्या हल्लेखोराने सहा वार केले. यामुळे सैफला मानेवर, पोटात आणि पाठीवर जखमा झाल्या. चाकूचे टोक त्याच्या मानेत घुसले होते. त्याला रिक्षामधून लिलावती रुग्णालयात रक्तबंबाळ अवस्थेत नेण्यात आलं. त्यानंतर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी तो चाकूचा तुकडा काढला.

हेही वाचा – जेहच्या खोलीतील बाथरूममध्ये…; सैफ अली खानच्या घरात काय घडलं? करीना कपूर कुठे होती? मदतनीसने सगळंच सांगितलं

हल्लेखोराचा पहिला फोटो सैफच्या वांद्रे येथील इमारतीच्या आतील होता. त्यात संशयित पायऱ्यांवरून खाली उतरताना आणि सीसीटीव्हीकडे पाहताना दिसला होता. आताच्या नवीन फोटोतही संशयित बॅकपॅक घेऊन दिसत आहे.

Saif Ali Khan stabbing suspect at bandra
सैफवर हल्ला करणाऱ्या संशियाताचा फोटो (सौजन्य सोशल मीडिया)

हेही वाचा – सैफ अली खानच्या शरीरातून काढलेल्या चाकूचा फोटो आला समोर; हल्ल्यात थोडक्यात बचावला अभिनेता

दरम्यान, सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पळून गेला असून त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी ३५ पथके तयार केली आहेत. सैफच्या घरात प्रवेश करण्यासाठी संशयिताने फायर एस्केप पायऱ्यांचा वापर केला होता. तो घरात सैफ व करीनाचा धाकटा मुलगा जेह यांच्या खोलीतील बाथरूममध्ये शिरला होता. त्याच्याजवळ काठी व चाकू होते. आरोपी जीवघेणा हल्ला करण्यापूर्वी तो अनेक तास घरात होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान त्याने टोपी घातली होती, जी नंतर त्याने काढून टाकली.

Story img Loader