आजकाल बॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सहज ५०० कोटीपेक्षा जास्त कमाई करताना दिसतात. जेवढी तगडी स्टारकास्ट तेवढा हीट चित्रपट असं गणित मानलं जातं. मात्र, बॉलीवूडमध्ये असा एक चित्रपट होऊन गेला ज्यामध्ये ३३ कलाकार असूनही तो बॉक्स ऑफिवर फ्लॉप ठरला. एवढचं नाही या चित्रपटामुळे अनेक कलाकारांचे करिअरही बुडाले.

हेही वाचा- सलमान खानशी खोटं बोलला ओरी, ‘त्या’ विधानावरून घेतली माघार; म्हणाला, “मुंबईमध्ये एखाद्या श्वानासारखं…”

women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
50 crore turnover of re-release films in two months
पुनःप्रदर्शित चित्रपटांची दोन महिन्यांत ५० कोटींची उलाढाल
Festival of Italian films at the Regal movie theater Cinema Paradiso
‘रीगल’मध्ये इटालियन चित्रपटांचा महोत्सव; रसिकांना विनामूल्य पाहण्याची संधि
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण

२००३ साली प्रदर्शित झालेला एलओसी कारगील चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. बॉलीवूडमधील अनेक मोठे कलाकार या चित्रपटात झळकले होते. एलओसी आत्तापर्यंतचा बॉलीवूडमधील सगळ्यात मोठा चित्रपट मानला जातो. साधारणत: कोणत्याही चित्रपटाचा वेळ ३ तास असतो. मात्र, एलओसी चित्रपट ४ तास ४४ मिनिटांचा होता. हा चित्रपट त्या काळातला बिग बजेट चित्रपट मानला जायचा.

हेही वाचा- “मी त्यावेळी खूप…”, ‘अर्जुन रेड्डी’तील मारहाणीच्या सीनवर शालिनी पांडेने सहा वर्षांनी दिली प्रतिक्रिया

बॉलीवूडमधील ३३ कलाकारांच्या भूमिका

एलओसी चित्रपटात बॉलीवूडमधील सगळ्यात जास्त कलाकार झळकले आहेत. जवळपास ३३ कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. संजय दत्त, अजय देवगण, सैफ अली खान, अक्षय खन्ना, अभिषेक बच्चन, , नागार्जून, मनोज बाजपेयी, आशितोष राणा, सुदेश बैरी, राज बब्बर, अवतार गिल, मोनिश बेल, करिना कपूर, राणी मुखर्जी, ईशा देओल, रविना टंडन सारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटाला लाभली होती. मात्र, तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

हेही वाचा- “तिने दिलेला संदेश…” राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात लग्नातील साडी नेसणाऱ्या आलिया भट्टचं सुहाना खानने केलं कौतुक

LOC चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली होती

जे पी दत्ता दिग्दर्शित एलओसी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाबाबत अनेक नकारात्मक प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या होत्या. महिनाभरातच या चित्रपटाने आपला गाशा गुंडाळला. ३३ कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला होता. मात्र जगभरात या चित्रपटाने केवळ ३१ कोटींची कमाई केली होती. भारतात या चित्रपटाने २० कोटींचा गल्ला जमवला होता. या फ्लॉप चित्रपटामुळे अनेक कलाकारांच्या करिअरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. करणनाथ, अमन कोहली, पुरी राजकुमार, साजद खान, अकबर नक्वी सारख्या कलाकारांना इतर चित्रपटात काम मिळणं बंद झालं.