दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो इन्स्टाग्रामवर सक्रिय झाल्या आहेत. त्या त्यांच्या अकाउंटवर अनके जुने किस्से शेअर करत असतात. नुकताच त्यांनी दिलीप कुमार व वैजयंतीमाला यांच्या फोटोबाबतचा एक किस्सा सांगितला आहे. आपल्याला वैजयंतीमालांचा दिलीप कुमार यांच्याबरोबरचा फोटो पाहून मत्सर वाटला होता, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शूटिंग करताना दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतरही किस करत होते ‘हे’ बॉलीवूड कलाकार, पाहा Photos

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
People who laughed at my work and made fun of me are today giving compliments and saluting Bela Gram Panchayat
‘टीका करणारे आता कौतुकाचा वर्षाव करीत आहेत’…राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बेला गाव अन् महिला सरपंचाची अनोखी यशोगाथा
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”

७९ वर्षीय सायरा बानो यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “बऱ्याचदा बालपण आणि तारुण्याच्या आठवणी खूप विचित्र, मजेदार असू शकतात. ही माझ्यासाठी १९५८ ची खास आठवण आहे, जेव्हा मी लहान होते. खरं तर गेल्या काही वर्षांत माझी आवडती फिल्म स्टार वैजयंतीमाला यांच्याशी माझं नातं चांगलं झालं आहे. त्या आता माझ्या ‘अक्का’ (मोठी बहीण) आहे. आम्ही दर आठवड्याला एकमेकींशी बोलतो.”

“त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

सायरा बानो पुढे म्हणाल्या, “जशीजशी मी मोठी होत होते, मला माझ्या पलंगाच्या अगदी शेजारी भिंतीवर माझ्या आवडत्या हार्टथ्रॉबचे फोटो चिकटवायची सवय होती, जेणेकरून मी उठल्यावर ते माझ्या नजरेस पडतील. एक वर्षापूर्वी लंडनमध्ये खास प्रदर्शित झालेल्या ‘शान’मध्ये मी साहबचा (दिलीप कुमार) दमदार अभिनय पाहिला होता. ते खूप हँडसम होते, मी त्यांच्यासाठी वेडी होते. त्यानंतर ‘द किंग ऑफ रॉक’ एल्विस प्रेस्ली, रॉक हडसन आणि जेम्स डीन यांचे कटआउट्सही भिंतीवर मी चिकटवले होते.”

“मला नग्न केलं होतं,” मराठमोळ्या सोशल मीडिया स्टारचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “मला खूप तुच्छतेने…”

“माझ्या आईला माहीत होतं की मला भारतीय चित्रपटांचे वेड आहे, म्हणून ती आमच्या मनोरंजनासाठी वेळोवेळी फिल्मफेअर मासिक पोस्ट करत असे. मासिक कोण आधी उचलणार याबाबत माझं आणि माझ्या भावाचं कायम भांडण व्हायचं. अशाच एका मासिकात त्याकाळी खूप बोल्ड समजल्या जाणाऱ्या ‘मधुमती’चा हा फोटो होता, ज्यात साहेब रोमँटिक स्टाईलमध्ये वैजयंतीमालाच्या कपाळावर त्यांचा चेहरा ठेवून होते,” असं त्या सांगतात.

“तो एक सुंदर फोटो होता आणि माझ्या लहानपणी वैजयंतीमालांना साहेबांच्या चेहऱ्याजवळ पाहून मला इतका मत्सर वाटला की मी कात्री घेतली आणि तो फोटो कापू लागले. आता जेव्हा मला ते आठवतं तेव्हा मी हसते. तोपर्यंत मी त्यांना कधीही चित्रपटात पाहिलं नव्हतं. नंतर नशिबाने मला त्या माझ्या कुटुंबातील सदस्यासारख्या झाल्या. त्यांच्यासोबत माझ्या अनेक रंजक आठवणी आहेत. मी ‘अक्का’चा खूप आदर करतो आणि एक दिवस मी त्यांना याबाबत सांगेन,” असं त्यांनी लिहिलं.

Story img Loader