अभिनेत्री सैयामी खेरने ‘मिर्झिया’ चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सध्या सैयामी तिच्या ‘घूमर’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘घूमर’ चित्रपटाच्या निमित्ताने सैयामीने अलीकडेच एका मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये आलेल्या अनेक धक्कादायक अनुभवांविषयी खुलासा केला आहे.
हेही वाचा : “१२५ ते १०० किलो…”, ‘बिग बॉस’ फेम पारस छाबराने कसं कमी केलं वजन? शेअर केलेल्या फोटोंची चर्चा
बॉलीवूडमध्ये नवोदित कलाकारांना प्रत्येक गोष्टीचा कसा सामना करावा लागतो याविषयी हिंदुस्थान टाइम्सला सांगताना सैयामी खेर म्हणाली, “माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला बॉलीवूडमधील अनेक लोकांनी सल्ले दिले होते. तुझ्या ओठांची आणि नाकाची सर्जरी कर…असे काहीजण सांगायचे. कोणत्याही १८ वर्षांच्या मुलीला असा सल्ला देणे एकदम चुकीचे आहे. मला तेव्हा सगळ्या गोष्टी अतिशय धक्कादायक वाटल्या. आयुष्यातील एका नव्या खेळात सहभागी होत आहे असे वाटले.”
हेही वाचा : Video: “विझत चालल्या या भूमीला….”, ‘लोकमान्य’साठी स्पृहा जोशी झाली गीतकार, प्रतिकिया देत नेटकरी म्हणाले…
सैयामी पुढे म्हणाली, “बॉलीवूडच्या या नियमांचा किंवा इथे असलेल्या लोकांचा मला कधीच त्रास झाला नाही. पण, मला आशा आहे की, हे सगळे नियम चित्रपटसृष्टीतून एक दिवस निघून जातील. या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाला विविध गोष्टी स्वीकाराव्या लागतात.”
हेही वाचा : “आलियाने एकाच आठवड्यात दोनदा लग्न…”, दिग्दर्शक करण जोहरचे वक्तव्य चर्चेत
कौटुंबिक सहकार्याबद्दल सैयामी म्हणाली, “माझे कुटुंबीय, जवळचे मित्र माझ्याबद्दल काय विचार करतात याची मला सगळ्यात जास्त काळजी असते. त्यांचे मत मला आयुष्यात जास्त महत्त्वाचे वाटते. आयुष्यातील सुरुवातीच्या त्या कठीण काळात मला माझे कुटुंबीय आणि मित्रांनी आधार दिला. आता हळूहळू बॉलीवूडमधील अनेक गोष्टी बदलत आहेत.” दरम्यान, ‘घूमर’ हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी यांच्यासारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.