रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे.
चित्रपटाचं जेवढं कौतुक होत आहे तितकीच टीकादेखील यावर होताना दिसत आहे. सामान्य प्रेक्षकांपासून कित्येक सेलिब्रिटीजदेखील या चित्रपटाबद्दल उघडपणे आपण मत मांडताना पाहायला मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री संयमी खेर हिने या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे आणि आपली नाराजी व्यक्त केली आहे. हा चित्रपट पाहून संयमी प्रचंड अस्वस्थ झाली अन् नेमका हा चित्रपट तिला का आवडला नाही याबद्दलही तिने तिचं मत व्यक्त केलं आहे. इतकंच नव्हे तर रणबीरचा ‘अॅनिमल’ पुन्हा पाहण्यापेक्षा त्याचे ‘रॉकस्टार’ व ‘बर्फी’ हे दोन चित्रपट पुन्हा पाहणं पसंत करेन असंही संयमी म्हणाली आहे.
संयमी म्हणाली, “मला बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की तू तुझं मत मांडू नकोस, पण खरंच हा चित्रपट पाहून मी खूपच अस्वस्थ झाले आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला त्याला जसा हवाय तसा चित्रपट करायचा पूर्ण अधिकार आहे, पण तुमची लोकांप्रती काही जबाबदारीदेखील आहे. चित्रपट हे लोकांना प्रभावित करणारे एक मोठे माध्यम आहे. चित्रपटात वाईट आणि कपटी पात्रं असणं स्वाभाविक आहे पण अशा वाईट पात्रांचं उदात्तीकरण हे मला योग्य वाटत नाही.”
पुढे संयमी म्हणाली, “हा चित्रपट पाहून मी जरा गोंधळात पडले, जर आपला प्रेक्षक असे चित्रपट पहात असेल तर या सगळ्यात मी स्वतः कुठे आहे? केवळ पुरुषच नव्हे तर स्त्रियांनादेखील हा चित्रपट आवडत आहे अन् त्या त्याचे कौतुकही करत आहेत. त्या दिग्दर्शकाने तुम्हाला चित्रपटगृहाकडे खेचलं आहे म्हणजेच त्यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे. पण चित्रपटात दाखवल्या गेलेल्या बऱ्याच गोष्टींशी मी सहमत नाही, मी अशा चित्रपटांची चाहती अजिबात नाही.” शाहरुखचा ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ प्रदर्शित होऊनसुद्धा ‘अॅनिमल’ची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही.