क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्सने परिपूर्ण असलेल्या ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ‘सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या ट्रेलरने असंख्य रसिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या चित्रपटाचा ट्रेलरची सुरुवात सजनी शिंदेच्या मृत्यूला जबाबदार कोण? या प्रश्नाने होते. यात सजनी शिंदे ही एक शिक्षिका अचानक गायब होते. तिचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आणि त्या व्हिडीओवर लाखो लाइक्स कमेंट्स येतात. मात्र शिक्षिका असेलल्या सजनीचा हा असा व्हिडीओ पाहून तिच्यावर टीका होते. ही टीका सहन न झाल्यानं सजनी टोकाचं पाऊल उचलते की आणखी काय? ती नेमकी कशी आणि का गायब होते? ती जिवंत आहे की नाही, या भोवती संपूर्ण चित्रपटाचे कथानक फिरताना दिसणार आहे.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”
या चित्रपटाच्या सस्पेन्स ट्रेलरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटात अनेक मराठी कलाकारही पाहायला मिळत आहे. यात सजनी शिंदे हे पात्र राधिका मदन साकारत आहे. तर निम्रत कौर ही या चित्रपटात पोलीस अधिकारी असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच यात भाग्यश्री, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, शशांक शिंदे आणि सुमीत व्यास यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका दिसणार आहेत.
आणखी वाचा : “घर घेतलं, पण इंटेरिअरसाठी पैसे नाहीत”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री व्यक्त केलं दु:ख, म्हणाली “माझा नवरा…”
या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. यापूर्वी त्यांनी स्त्री,भेडिया आणि बदलापूर यांसारखे अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मिखिल मुसळे यांनी केले आहे. मिखिल मुसळे आणि परिंदा जोशी यांनी चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. तर अतिरिक्त पटकथा आणि संवाद अनु सिंग चौधरी आणि क्षितिज यांनी दिले आहेत. ‘सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ हा चित्रपट २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.