Prabhas Starrer Salaar 2nd Trailer : दाक्षिणात्य कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा बहुचर्चित ‘डंकी’ आणि प्रभासचा ‘सालार’ हे चित्रपट लागोपाठ प्रदर्शित होत असल्याने दोन्ही अभिनेत्यांपैकी नेमकं कोण बाजी मारणार याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला काही दिवस बाकी राहिले असतानाच ‘सालार’च्या मेकर्सनी ‘डंकी’ला टक्कर देण्यासाठी दुसरा ट्रेलर रिलीज केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सालारचा पहिला ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यावर आता एक नवीन ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दुसऱ्या ट्रेलरबद्दल सांगायचं झालं, तर हा एकूण २.५४ मिनिटांचा जबरदस्त ट्रेलर प्रभास आणि पृथ्वीराज यांच्या अ‍ॅक्शनने परिपूर्ण आहे. या चित्रपटात पर्शियन साम्राज्याच्या सुलतानाची कथा दाखवण्यात आली आहे.

हेही वाचा : “१५ दिवस काही लोकांनी फक्त…”, सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी विक्रांत मेस्सीने मांडलं मत; म्हणाला, “बॉलीवूड…

पर्शियन साम्राज्याचा सुलतान आयुष्यात कितीही संकटं आली तरीही फक्त एका मित्राला सांगायचा. तो मित्र सुलतानाच्या मर्जीप्रमाणे सगळ्या गोष्टी पूर्ण करायचा. पण, जेव्हा हा मित्र सुलतानाचे आदेश ऐकणं बंद करतो तेव्हाच कथेत एक नवीन ट्विस्ट येतो. अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यामध्ये या सुलतानाची भूमिका साकारत आहे. जो मूळ कथेचा खलनायक आहे. तसेच प्रभास त्याच्या जवळच्या मित्राच्या भूमिकेत झळकणार आहे. ही कथा दोन मित्रांच्या घनिष्ट मैत्रीची अन् खानसारमधील सत्तेच्या गादीसाठी होणाऱ्या संघर्षाची आहे हे या ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : ‘एकापेक्षा एक’ फेम अभिनेत्री सुकन्या काळणचा पार पडला साखरपुडा, कुशल बद्रिकेची पत्नीसह हजेरी, फोटो व्हायरल

दरम्यान, प्रभाससह या चित्रपटात प्रमुख भूमिकेत अभिनेत्री श्रृती हासन दिसणार आहे. निर्मात्यांनी ‘सालार’चा दुसरा ट्रेलर प्रदर्शित केल्यामुळे शाहरुख खानच्या ‘डंकी’ला हा चित्रपट टक्कर देणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. आता ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बॉक्स ऑफिसवर कोण किती गल्ला जमावणार याकडे प्रभास आणि किंग खानच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salaar second trailer prabhas and prithviraj are friends who turn into enemy watch new trailer sva 00