Dunki box office collection Day 2: शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट गुरुवारी (२१ डिसेंबर रोजी) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३० कोटी रुपयांची कमाई केली. शाहरुखचे यंदा प्रदर्शित झालेले ‘पठाण’ व ‘जवान’ या चित्रपटांच्या तुलनेत ‘डंकी’ची पहिल्या दिवसाची कमाई कमी आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. ती पहिल्या दिवसापेक्षा खूप कमी आहे.

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान स्टारर चित्रपटाने शुक्रवारी २०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाचे देशातील एकूण कलेक्शन ४९.७ कोटी रुपये झाले आहे. शाहरुकच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’च्या पहिल्या दिवसाच्या आकडेवारीपेक्षा खूपच कमी आहे. ‘पठाण’ने ५७ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘जवान’ने पहिल्या दिवशी ७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘डंकी’ हा शाहरुखचा या वर्षातील तिसरा चित्रपट आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
vivek oberoi reveals why he rejected om shanti om film
विवेक ओबेरॉयचा १७ वर्षांनी खुलासा; शाहरुखचा ‘ओम शांती ओम’ सिनेमा का नाकारला? म्हणाला, ” तेव्हा ४ ते ५ महिने…”
Vanvaas Box Office Collection Day 4
नाना पाटेकरांच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर ‘वनवास’, चार दिवसांची कमाई फक्त ‘इतके’ कोटी
tharla tar mag can arjun sayali meets again madhubhau took strict decision
ठरलं तर मग : सायली-अर्जुनचं नातं कायमचं तुटणार? मधुभाऊंनी लेकीकडून घेतलं ‘हे’ वचन, तर दारात आलेला अर्जुन…; पाहा प्रोमो
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Pushpa 2 Box Office Collection
Pushpa 2 Box Office Collection Day 17: ‘पुष्पा २’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अजूनही जोरदार घोडदौड सुरुच; शनिवारी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
Vanvaas 1 Days Box Office Collection
‘वनवास’ची निराशाजनक सुरुवात, नाना पाटेकरांच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख

किंग खान व रणबीर कपूरला मागे टाकत प्रभासच्या ‘सालार’ने रचला नवा रेकॉर्ड; पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

‘सालार’च्या रिलीजचा परिणामही ‘डंकी’वर होऊ शकतो, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईत घट होऊ शकते अशी शक्यता आहे. प्रशांत नील दिग्दर्शित व प्रभासची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने शुक्रवारी भारतात ९५ कोटी रुपयांची कमाई करत आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग केली आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १७५ कोटी रुपये कमावले आहेत.

Dunki Box office collection 1: ‘जवान’ आणि ‘पठाण’च्या तुलनेत शाहरुख खानच्या ‘डंकी’ ची कमाई कमी, पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ कोटी

दरम्यान, वीकेंडला ‘सालार’ व ‘डंकी’ या चित्रपटांच्या कमाईकडे सर्वांचे लक्ष असेल. ‘सालार’ ची क्रेझ पाहता त्याचा ‘डंकी’ ला फटका बसणार की प्रभासची जादू फक्त दक्षिणेत आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये ‘डंकी’ ची क्रेझ पाहायला मिळणार हे वीकेंडच्या कमाईच्या आकडेवारीवरून दिसून येईल. ‘डंकी’ मध्ये शाहरुख खानबरोबरच तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर आणि अनिल ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत. तर, ‘सालार’ मध्ये प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, मीनाक्षी चौधरी, श्रुती हासन, सरण शक्ती, इश्वरी राव, जगपती बाबू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Story img Loader