दिग्गज पटकथालेखक सलीम खान यांनी २४ नोव्हेंबरला आपला ८९ वा वाढदिवस साजरा केला. सलमान खान, अरबाज खान आणि सोहेल खान या त्यांच्या मुलांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. सलीम खान यांना बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या, पण या शुभेच्छांपेक्षा एका व्यक्तीने दिलेल्या शुभेच्छांची चर्चा झाली. ती व्यक्ती म्हणजे लुलिया वंतूर. लुलियाने सलीम खान यांना सोशल मीडियावर पोस्ट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लुलिया वंतूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सलीम खान यांच्याबरोबरचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबरच तिने एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिलं आहे, ज्यामुळे या पोस्टची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा…अभिषेक बच्चनच्या चित्रपटाला प्रेक्षक मिळेना; I Want To Talk सिनेमाचे ३ दिवसांचे कलेक्शन फक्त ‘इतके’

लुलियाने लिहिलं, “जगातील माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तींमधील एक अशा व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी मला अगदी घरच्या सदस्यासारखंच वागवलं, त्यामुळे मला भारत माझं दुसरं घरच वाटतो, त्याबद्दल मी त्यांची नेहमी आभारी राहीन. दिग्गज सलीम खान हे ते व्यक्ती आहेत, ज्यांनी एक सुंदर आणि भक्कम वारसा तयार केला आहे; त्यांनी एक असं कुटुंब तयार केलं आहे, जिथे एकमेकांवर प्रेम करणारी आणि नेहमी एकत्र राहणारी प्रेमळ माणसं आहेत. तुम्हाला चांगलं आरोग्य, प्रेम आणि आनंद मिळत राहो, अशी माझी मनापासून इच्छा आहे. तुम्ही नेहमी इतरांना प्रेरणा द्यावी आणि तुमचं ज्ञान पसरवत राहावं. तुम्ही आणखी कथा लिहाव्यात, हीच माझी प्रार्थना आहे.”

चाहत्यांची आणि सेलिब्रिटींची पोस्टवर प्रतिक्रिया

लुलियाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. मुदस्सर खानने लुलियाच्या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत. हिमेश रेशमियाची पत्नी सोनिया कपूरने रेड हार्ट इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. चाहत्यांनीही सलीम खान यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा…ऋषी कपूर यांच्या ‘या’ होत्या अखेरच्या दोन इच्छा, लेक रिद्धिमा कपूर-साहनीने केला खुलासा; म्हणाली…

सलमान आणि लुलियाच्या नात्यावर चर्चा

लुलिया वंतूर आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल अनेक वेळा चर्चा रंगली आहे. मात्र, त्यांनी कधीही यावर भाष्य केलं नाही. तरीही लुलिया अनेक वेळा सलमान खानला तिच्या करिअरमधील यशासाठी श्रेय देते. सलमानच्या कुटुंबाबरोबर लुलियाचे चांगले संबंध असल्याने सलमान आणि तिच्या नात्याची चर्चा होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salim khan 89th birthday iulia vantur wishes him share a post on social media psg