गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता रोहित गर्ग नावाच्या एका तरूणाकडूनही त्याला धमकीचा मेल आला आहे. सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई मेल पाठवून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सलमान खानला मिळालेल्या धमकीनंतर मुंबई पोलिसांकडून अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर त्याचे वडील आणि बॉलिवूड अभिनेते सलीम खान यांची चिंता वाढली आहे. अभिनेत्याला धमकीचा मेल आल्यानंतर सलीम खान रात्रभर झोपू शकले नाहीत. ते खूप शांत असल्याचा खुलासा सलमानच्या जवळच्या मित्राने केला आहे. सलीम खान यांनी सलमानची खूप काळजी वाटत असल्याचंही मित्राने सांगितलं.

हेही वाचा>> “कौटुंबिक दबावामुळे त्याने…” धमकीचा मेल अन् सुरक्षा वाढवल्याबद्दल सलमान खानची प्रतिक्रिया काय? मित्राने दिली माहिती

हेही वाचा>> एमसी स्टॅन व अब्दु रोझिकमधील वादावर शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला “त्यांच्यामध्ये…”

धमकीचा मेल आल्यानंतर सलमानच्या प्रतिक्रियेबद्दलही एका जवळच्या मित्राने माहिती दिली आहे. “या गोष्टींचा अभिनेत्याला फरक पडत नाही. सलमान ही धमकी अगदी सामान्य पद्धतीने घेत आहे. तसेच पालकांना त्रास होऊ नये म्हणून कदाचित तो तसं भासवतोय. एकत्र राहणाऱ्या या कुटुंबाची खास गोष्ट म्हणजे ही भीती त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नाही”, असं मित्राने सांगितलं.

हेही वाचा>> रोहित शेट्टीच्या चित्रपटात झळकणार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात, ट्रेलरमध्ये दिसली झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलमान खानचा जवळचा सहकारी प्रशांत गुंजाळकर याला शनिवारी(१८ मार्च) धमकीचा ई-मेल पाठवण्यात आला होता. मेल पाठवणाऱ्या तरुणाचं नाव रोहित गर्ग असल्याची माहिती समोर येत आहे. सलमान खानच्या टीमने संशयित आरोपी रोहित गर्ग, गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.