अभिनेता अरबाज खानच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर अरबाज (२४ डिसेंबर रोजी) लग्नबंधनात अडकला. त्याने ५६ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. त्याच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. अरबाजच्या पत्नीचे नाव शुरा खान असून त्यांचा विवाहसोहळा अर्पिता खानच्या घरी पार पडला.

अरबाज खानच्या लग्नाला रवीना टंडनने लेक राशा थडानीबरोबर हजेरी लावली. तर, रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख दोन्ही मुलांसह या लग्नसोहळ्याला उपस्थित होते. अरबाजचा मुलगा अरहान देखील या लग्नात हजर होता. इतकंच नव्हे तर खुद्द भाईजान सलमान खानचा सुद्धा आपल्या भावाच्या दुसऱ्या लग्नात थीरकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गेले काही दिवस सोशल मीडियावर याच गोष्टीची चर्चा आहे.

UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
jalna inter religious marriage news in marathi
साखळदंडाने बांधलेल्या विवाहितेची मुलासह मुक्तता, आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग
Dodi Khan Denies Marriage Plans With Rakhi Sawant_
राखी सावंतशी तिसरं लग्न करण्यास पाकिस्तानच्या डोडी खानचा नकार; म्हणाला, “मी तुझे लग्न माझ्या…”
who is rakhi sawant future husband pakistani actor dodi khan
राखी सावंत आता पाकिस्तानची होणार सून! अभिनेत्रीचा होणारा नवरा डोडी खान आहे तरी कोण? जाणून घ्या…
How every sexual intercourse is rape with promise of marriage
विवाहाच्या वचनाने केलेला प्रत्येक शरीरसंबंध बलात्कार कसा?
kareena kapoor
हल्ल्यानंतर सैफ अली खान आणि करीनाने मुलांसाठी घेतला मोठा निर्णय; पापाराझींना केली ‘ही’ विनंती
rakhi sawant maarige to dodo khan pakistani
राखी सावंत ‘या’ पाकिस्तानी व्यक्तीबरोबर करणार तिसरं लग्न? विवाहाचे प्लॅन्स सांगत अभिनेत्री म्हणाली, “इस्लामिक पद्धतीने…”

आणखी वाचा : ऑस्कर विजेत्या ‘पॅरासाइट’ फेम अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; स्वतःच्याच कारमध्ये आढळला मृतदेह

बऱ्याच लोकांनी या लग्नानंतर अरबाजची पहिली पत्नी व अभिनेत्री मलायका अरोराला ट्रोल केलं तर कित्येकांनी अरबाजवर टीका केली आहे. नुकतंच अरबाजचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी या गोष्टीवर भाष्य केलं आहे. ‘न्यूज १८ शोशा’शी संवाद साधताना सलीम खान म्हणाले, “लग्न करण्याचा निर्णय हा सर्वस्वी त्यांचा आहे, अन् माझ्यामते तरी हा काही गुन्हा नाही. मला वाटत नाही यासाठी त्यांनी चर्चा करायला हवी होती. तो तरुण आहे, सुशिक्षित आहे, समजूतदार आहे व स्वतःचे निर्णय घेण्यास समर्थ आहे. त्यामुळे माझ्या परवानगीची काहीच आवश्यकता नाही. जर तो खुश असेल तर मला आणखी काहीच नको.”

अरबाजने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले जे चांगलेच व्हायरल झाले आहेत. अरबाज खानच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील कलाकार व चाहते कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. या पोस्टवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, अरबाज खानचे पहिले लग्न मलायका अरोराशी झाले होते. त्यांनी सहा वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. १९ वर्षांच्या संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान नावाचा मुलगा आहे.

Story img Loader