अभिनेता अरबाज खानचा नवा शो ‘द इनव्हिसिबल्स विथ अरबाज’ सध्या खूपच चर्चेत आहे. या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला आहे आणि त्यात अरबाज खानचे पहिले पाहुणे त्याचे वडील सलीम खान असल्याचं पाहायला मिळत आहे. अरबाज खानच्या या शोमध्ये सलीम खान यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. एवढंच नाही तर विवाहित असूनही अभिनेत्री हेलनशी असलेलं अफेअर आणि मग केलेलं दुसरं लग्न यावरही त्यांनी गप्पा मारल्या.

सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अभिनेत्री हेलनशी दुसरं लग्न केलं होतं. या शोमध्ये अरबाजने वडिलांना त्याचं दुसरं लग्न आणि त्यानंतर आई सलमाची नाराजी यावर काही प्रश्न विचारले. मुलाच्याच शोमध्ये प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी खासगी आयुष्यातली बरीच गुपितं उघड केली आहेत.

salman khan reacted on aishwarya rai abhishek bachchan marriage
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न केल्यानंतर सलमान खान म्हणालेला, “माझ्या आयुष्याचा एक…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
saif ali khan amrita singh marriage story
सैफ अली खानने २१व्या वर्षी केले होते लग्न, आई-वडिलांनाही दिली नव्हती कल्पना; किस्सा सांगत म्हणालेला, “पहिलीच डेट आणि…”
Shah Rukh Khan
“शूटिंगच्या पहिल्या दिवशी तो माझ्याकडे आला अन् म्हणाला….”, बॉलीवूड अभिनेत्रीने शाहरुख खानबद्दल केलं वक्तव्य चर्चेत
Mithun Chakraborty gets threat from pakistani gangster Shahzad Bhatti
पाकिस्तानी गँगस्टरकडून मिथुन चक्रवर्ती यांना धमकी, मुस्लिमांबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा उल्लेख करत म्हणाला…
khushi kapoor boyfriend vedang raina name spotted on her bracelet
खुशी कपूरने स्वत: दिली प्रेमाची कबुली; बॉयफ्रेंडचं नाव लिहिलेला ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
shatrughan sinha cheated on poonam sinha
“पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”

सलीम खान यांच्या मते, जेव्हा ते हेलन यांना मदत करत होते तेव्हा त्यांचा चुकीचा काहीच हेतू नव्हता. नंतर सर्व ओघात घडत गेलं. शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये सलीम खान म्हणाले, “त्यावेळी तिच्या वयानुसार अगोदर काम करायची तशा भूमिका मिळणं कठीण झालं होतं. ती कामासाठी माझ्याकडे आली आणि त्यावेळी आमचं काम खूप चांगलं सुरू होतं. त्यामुळे मी तिला काही चित्रपट मिळवून दिले आणि त्यानंतर आम्ही एकमेकांच्या जवळ आलो.”

आणखी वाचा- “शाहरुखबरोबर स्क्रीनवर…”, ‘पठाण’बद्दल पहिल्यांदाच बोलला सलमान खान

सलीम खान यांनी असाही खुलासा केला की, त्यांनी स्वतःच पत्नी सलमा यांना त्यांच्या आणि हेलनच्या नात्याबद्दल सांगितलं होतं. ते पुढे म्हणाले, “सलमाला हे कळल्यानंतर तिने असं नाही म्हटलं की तुम्ही काहीतरी चांगलं केलं आहे. तुम्हाला तर यासाठी अवॉर्ड मिळायला हवा. हा एक भावनिक अपघात होता जो कोणाबरोबरही होऊ शकतो. ती अर्थातच दुखावली गेली होती. पण मी नंतर सर्व गोष्टी व्यवस्थित सांभाळल्या.”