भारतीय चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्यात जितका दिग्गज कलाकारांचे योगदान आहे. तितकेच योगदान हे लेखक-दिग्दर्शकांचा आहे. यामध्ये सलीम खान(Salim Khan)-जावेद अख्तर या लेखक जोडीचे नाव अग्रस्थानी येते. सलीम खान व जावेद अख्तर या जोडीनं ‘शोले’, ‘दीवार’, ‘जंजीर’, ‘त्रिशूल’, ‘शक्ती’, अशा अनेक चित्रपटांच्या कथा लिहिल्या. आता मात्र सलीम खान यांनी त्यांच्या खासगी आयुष्यावर वक्तव्य केल्याने ते चर्चेत आले आहेत. त्यांनी त्यांच्या दोन्ही पत्नींचे एकमेकींबरोबर कसे नाते आहे, यावर वक्तव्य केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काय म्हणाले सलीम खान?
सलीम खान यांनी नुकतीच ‘डीएनए'(DNA)बरोबर संवाद साधला. सलमा खान ही सलीन खान यांची पहिली पत्नी आहे. तर हेलन ही त्यांची दुसरी पत्नी आहे. सलीम खान यांनी मुलाखतीत म्हटले, “मी भाग्यवान आहे. कारण-मला दोन सुंदर बायका आहेत आणि त्या एकोप्याने राहतात. जरी हे काही वर्षानंतर घडले असले तरी काही हरकत नाही. त्या अत्यंत सुंदर दिसतात आणि आता सुंदर पद्धतीनं त्या वृद्ध होत आहेत”
याआधी झूमला दिलेल्या एका मुलाखतीत सलीम खान यांनी पहिल्या पत्नीला हेलनबरोबरचे त्यांचे नाते मान्य नव्हते,असे म्हटले होते. आमच्यात काही समस्या होत्या, मात्र त्या काही काळापुरत्याच होत्या.त्यानंतर सगळे काही स्वीकारले गेले. मी माझ्या मुलांना सांगितले होते की माझ्या आयुष्यात आणखी एक व्यक्ती आहे.मी तिच्याबरोबर लग्न केले आहे. मी तुमच्याकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही.जितके प्रेम तुम्ही तुमच्या आईवर करता तितकं तुम्ही हेलनवर करा, ही अपेक्षा मी ठेवणार नाही. पण, मला तिच्यासाठी तुमच्याकडून तेवढाच आदर हवा आहे.”, अशी आठवण त्यांनी सांगितली होती.
ती आमच्या आयुष्याचा महत्वाचा…
सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या आयुष्यावर आधारित ‘अँग्री यंग मेन’ ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये सलीम खान यांनी जेव्हा सलमा खान यांच्याबरोबर लग्न झालेले असताना जेव्हा अभिनेत्री हेलन यांच्याबरोबर दुसरे लग्न केले, त्यावेळी सलमा खान यांनी ती परिस्थिती कशी हाताळली आहे, याबद्दल अरबाज खानने वक्तव्य केले आहे.
या डॉक्युमेंटरीमधील एका एपिसोडमध्ये अरबाज खानने वडिलांनी जेव्हा दुसरे लग्न केले होते, त्यावेळची आठवण सांगितली आहे. तो म्हणतो, “माझी आई सलमा खानने वडिल सलीम खान किंवा हेलन आंटी यांच्याबरोबर वाईट वागण्यास कधीही प्रभावित केले नाही. त्या काळात तिला त्रास झाला पण तुझे वडील वाईट आहेत किंवा असे वागत आहेत, असे तिने आम्हाला कधीही सांगितले नाही. आम्ही आजही आमच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीला हेलन आंटी अशी हाक मारतो, कारण त्यावेळी ती हेलन आंटी होती. पण आईसारखीच वागणूक तिलाही देतो. ती आमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. ती आमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा भाग व्हावी, यासाठी माझ्या आईने प्रयत्न केले आहेत.” अशी आठवण अरबाज खानने सांगितली आहे.
दरम्यान, सलीम खान यांनी सलमा खान यांच्याबरोबर १९६० मध्ये लग्नगाठ बांधली तर हेलन यांच्याबरोबर १९८० मध्ये लग्नगाठ बांधली.