बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान ५८ व्या वर्षीही अविवाहित आहे. तो अविवाहित का आहे, याबद्दल त्याला अजूनही प्रश्न विचारले जातात. साठीत पोहोचलेल्या सलमानला अजुनही सेलिब्रिटी व चाहते लग्न करण्याबद्दल प्रश्न विचारत असतात. त्यावर सलमान योग्य जोडीदार भेटल्यावर लग्न करेल असं उत्तर आधी द्यायचा. आता तर लग्नाच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळतो. सलमानचे वडील सलीम खान मुलगा अविवाहित असल्याबद्दल बोलतानाचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओमध्ये सलीम खान म्हणतात की सलमानला नात्यात यायची घाई असते, पण ते नातं पुढे नेण्यास त्याला संकोच वाटतो. कारण त्याला भीती वाटते की त्याच्या आईमध्ये असलेले गुण आणि क्षमता समोरच्या व्यक्तीकडे नसतील. “तो सहज एखाद्या व्यक्तीबरोबर रिलेशनशिपमध्ये जातो, पण लग्न करण्याचं धाडस त्याच्यात नाही. त्याचा स्वभाव अतिशय साधा आहे आणि तो सहज आकर्षित होतो, पण ती व्यक्ती आपल्या आईप्रमाणे कुटुंब सांभाळू शकेल की नाही, अशी भीती त्याला वाटते. त्याची इच्छा आहे की तो जिच्याशी लग्न करेल, तिने त्याच्या आईप्रमाणेच आपल्या पती आणि कुटुंबासाठी वचनबद्ध असावं. तिने मुलांसाठी जेवण बनवलं पाहिजे, त्यांना तयार होण्यास मदत केली पाहिजे आणि त्यांचा अभ्यास केला पाहिजे. पण आजच्या काळात ते सोपं नाही,” असं सलीम खान म्हणाले.

२५० कोटींचे कर्ज फेडण्यासाठी विकलं ऑफिस? आमदार धिरज देशमुखांचे सासरे म्हणाले, “मी गेल्या ३० वर्षांपासून…”

यापूर्वी रेडिटवर पोस्ट केलेल्या एका व्हायरल व्हिडीओमध्ये सलमानने दावा केला होता की तो अजूनही अविवाहित आहे ही त्याची चूक आहे. “पहिली गर्लफ्रेंड सोडून जाते तेव्हा तुम्हाला वाटतं की ती तिची चूक होती, जेव्हा दुसरी जाते तेव्हाही तुम्हाला वाटतं की ही तिची चूक होती, जेव्हा तिसरीही असंच करते तेव्हा तुम्हाला वाटते की चूक तिचीच होती पण चौथ्या वेळी तुम्हाला शंका वाटू लागते आणि ‘दोष त्यांचा आहे की माझा?’ असा प्रश्न पडू लागतो. कदाचित मला भीती वाटते की मी त्यांना आनंदी ठेऊ शकत नाही,” असं सलमान म्हणाला होता.

सोनाक्षी सिन्हाने लग्नात नेसली आईची साडी, तर रिसेप्शनच्या लाल बनारसी साडीची किंमत फक्त…

सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तो शेवटचा ‘टायगर ३’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात कतरिना कैफ व इम्रान हाश्मी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता सलमान लवकरच एआर मुरुगदास यांच्या ‘सिकंदर’ चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये रश्मिका मंदानादेखील आहे. तसेच सत्यराज व सुनील शेट्टीदेखील या चित्रपटात असतील असं म्हटलं जात आहे.

Live Updates