Salim Khan : अभिनेता सलमान खान याच्यावर काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. तसंच त्यामुळे त्याला ठार मारण्याची धमकीही लॉरेन्स बिश्नोई गँगकडून देण्यात येते. १२ ऑक्टोबरला बाबा सिद्दीकींची हत्या झाली त्यानंतरही सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. मात्र सलमानचे वडील यांनी सलमानने शिकार केलेली नाही असं म्हटलं आहे. तसंच सलमान माझ्याशी खोटं बोलणार नाही असंही ते म्हणाले आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी आल्यानंतर सलीम खान ( Salim Khan ) यांनी या प्रकरणाबाबत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्या झाल्याचं पाहून आम्हाला वाईट वाटलं-सलीम खान

“बाबा सिद्दीकींची हत्या ज्या प्रकारे झाली त्याचं आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटलं. त्याने अनेक लोकांची मदत केली होती. बाबाला मी खूप दिवसांपासून ओळखत होतो. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मला वाईट वाटलं. बाबा सिद्दीकीला मी सांगितलं होतं जिंदगी और मौत खुदा के हातमें है. असं सलीम खान यांनी सांगितलं. तसंच सध्या जो माफी मागण्याचा सल्ला सलमानला दिला जातो आहे त्यावर सलीम खान म्हणाले कशाची माफी मागायची? गुन्हा केला असेल तर माफी मागणार ना? असं सलीम खान ( Salim Khan ) यांनी म्हटलं आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

मी महात्मा गांधींचा अनुयायी आहे-सलीम खान

माफी त्या व्यक्तीकडे मागितली ज्याला धोका दिला, पैसे खाल्ले, त्रास दिला असेल तर माफी मागितली जाते. मी महात्मा गांधींचा अनुयायी आहे. मी काय म्हणणार महात्मा गांधींजी मला माफ करा? असं तर होणार नाही. मी त्यांचा अनुयायी आहे. पाच कोटी रुपये द्या आम्ही माफ करु. आम्ही सुरुवातीपासूनच हे म्हणत आहोत की हे सगळं प्रकरण खंडणीचं आहे. असंही सलीम खान ( Salim Khan ) यांनी म्हटलं आहे.

लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीबाबत काय म्हणाले सलीम खान?

“सलमान खानने माफी कसली मागायची? सलमानने माफी मागितली तर ही बाब सिद्ध होईल की त्याने काळवीट मारलं. त्याने शिकार केलेलीच नाही. मी आजवर कधीही कुठल्या प्राण्याला मारलेलं नाही. सलमाननेही आजवर एकही प्राणी मारलेला नाही. आम्ही झुरळही मारलेलं नाही. आम्ही या गोष्टींवर विश्वासच ठेवत नाही. एकदा एक मुलगी म्हणाली होती की सलीम खान खूप सभ्य आहेत. ते मॉर्निंग वॉक करताना वरही बघत नाहीत खाली पाहून चालतात. मी त्या मुलीला सांगितलं आपण चालताना काही किडे, माशा, इतर छोटे प्राणी पायाखाली चिरडून मरु नयेत म्हणून मी खाली पाहून चालतो असं उत्तर मी त्या मुलीला दिलं होतं. मी मुक्या प्राण्यांवर प्रेम करतो. तसंच सलमानचंही खूप प्रेम आहे” असं सलीम खान ( Salim Khan ) म्हणाले.

हे पण वाचा- “जर सलमान खानला जिवंत राहायचं असेल तर…”, लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने आली धमकी; केली ‘ही’ मागणी!

काळवीट मारलं गेलं तेव्हा सलमान मला म्हणाला होता की मी तिथे नव्हतो-सलीम खान

“Being Human च्या मार्फत आम्ही प्राण्यांनाही जीवदान दिलं आहे. मला आठवतं त्याप्रमाणे सलमानने एक कुत्रा पाळला होता. तो त्याला मित्रासारखं सांभाळत होता. तो कुत्रा जेव्हा मेला तेव्हा सलमान खूप रडला होता. मी जेव्हा काळवीटाची शिकार झाली तेव्हा सलमानला विचारलं की हे कुणी केलं? त्यावर तो मला म्हणाला की मी तिथे नव्हतो. तो माझ्याशी खोटं बोलणार नाही. जनावारांची शिकार करणं त्याला आवडत नाही. तसंच Being Human च्या माध्यमातून आम्ही लोकांचीही भरपूर मदत केली आहे. रोज लोक रांग लावायचे. नंतर कोर्ट केस झाल्यावर कलम १४४ लावण्यात आलं. त्यामुळे आता लोक येत नाहीत.” असंही सलीम खान ( Salim Khan ) यांनी म्हटलं आहे. सलीम खान यांनी एबीपी न्यूजला मुलाखत दिली. त्यामध्ये सलमान खानने शिकार केलेली नाही असं सलीम खान ( Salim Khan ) यांनी म्हटलं आहे.

salman khan family is worried after baba siddique murder
सलमानच्या सुरक्षेबाबत अरबाज खानचं मत ( फोटो सौजन्य : Varinder Chawla)

आमचं कुटुंब चिंतेत आहे, पण मला सांगाना कशासाठी माफी मागायची?

आमचं कुटुंब चिंतेत आहे. पण आता आम्ही काय करायचं? माफी मागायला सांगत आहेत काय गुन्हा केला म्हणून माफी मागायची? आमच्यापैकी कुणी बंदुकही वापरलेली नाही. ज्या काही धमक्या येत आहेत तोपर्यंत भरपूर काळजी आम्हाला घ्यावी लागते आहे. सलमानला सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यांचीही जबाबदारी आमच्यावर आहे. सलमानसाठी मी घाबरलो आहे असं नाही. पण सलमानने कुणाची माफी मागायची ते सांगा? सलमानचं प्राण्यांवर प्रेम आहे. सलमान कधीही असं करणार नाही. कुणी पाहिलं आहे का? कुणाच्या समोर ही शिकार झाली आहे? सलमान खानवर हा आरोप उगाच लावण्यात आला आहे. यातून त्या लोकांना फक्त खंडणी उकळायची आहे. असाही आरोप या मुलाखतीत सलीम खान यांनी केला.