दिवाळीचा सण काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून बॉलीवूडमध्ये तर दिवाळी पार्टी सुरू झाल्या आहे. बॉलीवूडमध्ये या उत्सवाच्या आधीच एका ग्लॅमरस सोहळ्याने लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने आयोजित केलेल्या या भव्य दिवाळी पार्टीत अनेक स्टार्सनी आपला जलवा दाखवला. यावेळी सर्वांनी आपली उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा सादर केली आणि ते उत्साहात सहभागी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानने या पार्टीला हजेरी लावली नाही, परंतु त्याची बहीण अर्पिता खान तिचा पती अयुष शर्माबरोबर उपस्थित होती. त्यांचे स्वागत दिग्गज अभिनेत्री रेखाने केले. रेखाने अर्पिताला प्रेमाने आलिंगन दिलं, सोशल मीडियावर या क्षणांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये रेखा आयुष शर्मा यांच्याशी गप्पा मारत असताना दिसत आहे. त्यानंतर त्या दोघांनी रेड कार्पेटवर पोझ दिल्या.

हेही वाचा…“दंगलने २ हजार कोटी कमावले अन् आम्हाला फक्त…”, बबिता फोगटचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या वडिलांनी…”

अर्पिताबरोबर अलविरा खान अग्निहोत्रीही तिचा पती अतुल अग्निहोत्री आणि मुलगी अलिझेह अग्निहोत्रीसह या पार्टीत सहभागी झाली होती.

सलमान नाही आला कारण…

लॉरेन्स बिष्णोई गँगच्या धमक्यांमुळे सलमान खान या पार्टीला येऊ शकला नाही. मुंबईतील राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या खुनानंतर सलमान खानची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी हे सलमानचे मित्र होते, तर लॉरेन्स बिष्णोईच्या गँगमधील लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा…“…आणि आमचे सूर जुळले…”, अनुपम खेर यांनी सांगितला लग्नाचा किस्सा; म्हणाले…

चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम दिसणार एकत्र

अनेक धमक्या मिळत असतानाही सलमान खान आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याने नुकतंच ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील आपला बहुप्रतीक्षित कॅमिओ शूट केला आहे. या चित्रपटात तो अजय देवगणबरोबर दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट विशेष ठरणार आहे, कारण या चित्रपटात दोन आयकॉनिक पात्रं, म्हणजेच चुलबुल पांडे आणि बाजीराव सिंघम एकत्र येणार आहेत. या सीनची चाहत्यांना खूप उत्सुकता आहे, कारण हा चित्रपट भरपूर अ‍ॅक्शन आणि मनोरंजनाबरोबर दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan absence at manish malhotra diwali party rekha share sweet moment with arpita khan psg