अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि सलमान खानचं अफेअर बॉलिवूडमध्ये एकेकाळी सर्वात चर्चेतला विषय होता. पण दोघांचं ब्रेकअप झालं, त्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं आणि आयुष्यात स्थिरावली. दुसरीकडे, सलमान खान मात्र अद्यापही अविवाहित आहे.

दोघांच्या ब्रेकअपला दोन दशकांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. पण अजुनही ते कधीच एकमेकांच्या समोर आलेले नाहीत. अशातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ते एकत्र पोज देताना दिसत आहेत. तसेच दोघेही हसून बोलतात आणि ऐश्वर्या सलमानचा कोट नीट करताना दिसते. सुरुवातीला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही चक्रावले, कारण ही अशक्य गोष्ट होती. पण हा व्हिडीओ खरा नसून एडिटेड असल्याची बाब समोर आली आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमातील काही कट्स वापरून हा व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे. सलमान व ऐश्वर्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिषेक घटस्फोट घेणार अशा मजेशीर कमेंट्स नेटकरी करत आहेत. पण हा व्हिडीओ पूर्णपणे एडिटेड आहे आणि यात कोणतही सत्य नाही.

screen shot
व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्याची कमेंट

दरम्यान, काहींनी हा व्हिडीओ एडीट करणाऱ्याचं कौतुक केलंय. तर अनेकांनी त्याला खडे बोल सुनावले आहेत. इतकं चांगलं एडिटिंग येतं तर ते दुसऱ्या कामासाठी वापर, असे फेक व्हिडीओ तयार करू नकोस, असे सल्लेही अनेकांनी या एडिट करणाऱ्याला दिले आहेत.

Story img Loader