सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई आणि त्याची टोळी चांगलीच चर्चेत आली होती. त्यांच्या निशाण्यावर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान असल्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. सलमान खानला मारायचा कटही रचण्यात आला होता जो अयशस्वी झाला आणि काही गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यातदेखील घेतलं. सिद्धूच्याही आधी सलमानला मारायचं असल्याचं लॉरेन्स बिश्नोईने स्पष्ट केलं होतं.

मध्यंतरी यावरुन सलमान खान आणि त्याचे वडील यांना धमक्यांची पत्रंदेखील आली होती. या पत्रांच्या आधारावर मुंबई पोलिसांना काही गुन्हेगारांना अटकदेखील केली. या घटनेनंतर सलमानला मुंबई पोलिसांनी संरक्षण दिलं होतं. आता ‘मिड डे’च्या रिपोर्टनुसार सलमान खानला ‘वाय +’ संरक्षण देण्यात आलं आहे. यापुढे सलमानच्या संरक्षणात आणखी काही बॉडीगार्ड्सची भर पडणार आहे.

Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
arvind sawant
“तेव्हा मी त्यांची लाडकी बहीण होती, पण आता…”; ‘त्या’ विधानावरून शायना एनसींचं अरविंद सावतांवर टीकास्र!
Kartik Aaryan
“एक वेळ अशी होती की…”, कार्तिक आर्यनने सांगितली संघर्षाच्या काळातील आठवण; म्हणाला…
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”
devendra fadnavis and dawood
Nawab Malik : नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; म्हणाले, “दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांविरोधात…”
lawrence bishnoi interview
पोलीस स्टेशन नव्हे, लॉरेन्स बिश्नोईचा स्टुडिओ? उच्च न्यायालयानं पोलिसांना घेतलं फैलावर!
Salman Khan Threatened Indira Krishnan
‘तेरे नाम’ चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने ‘या’ अभिनेत्रीला दिली होती धमकी; म्हणाला, “मी मोठा तमाशा….”

आणखी वाचा : अशोक मामांचं नाटक पाहून राज ठाकरे भारावले, म्हणाले “तुम्हाला पाहून…”

फक्त सलमानच नाही तर खिलाडी कुमार अक्षय कुमारलाही ‘एक्स’ प्रकारातील सुरक्षा देण्यात आल्याचं समोर आलं आहे. अक्षयच्या सुरक्षेसाठी खास ३ गार्ड्स कायम तैनात असणार असल्याचंही स्पष्ट होत आहे. अक्षयबरोबरच अनुपम खेर यांनाही अशीच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. एकूणच बॉलिवूड सेलिब्रिटीजला मिळणाऱ्या धमक्यांमुळे ही पावलं उचलली जात आहेत.

मुंबई, पंजाब आणि दिल्लीतील तपासाच्या आधारे समोर आलं की गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांनी सलमान खानला मुंबईत मारण्याची योजना आखली होती. २०१७ मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या वेळी त्याच्या वांद्रे येथील घराबाहेर आणि एकदा २०१८ मध्ये त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानला मारायचा प्रयत्न झाला. शिवाय अनुपम खेर यांना ‘द काश्मीर फाइल्स’ रिलीज झाल्यानंतर धमक्या मिळाल्यामुळे आणि अक्षय कुमारला सोशल मीडियावर येणाऱ्या धमक्यांमुळे सुरक्षा पुरवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.