सध्या सलमान खान ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर व्हिडीओ आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी रिलीज झाला आहे. ट्रेलर लाँच दरम्यान, ‘तेरे नाम’ फेम निर्जरा ऊर्फ भूमिका चावला हीदेखील त्याच्यासोबत दिसली होती. या दोघांची जोडी वीस वर्षांनंतर पडद्यावर एकत्र दिसली. २००३ मध्ये ‘तेरे नाम’ या चित्रपटात ते एकत्र दिसले होते. या दरम्यान भाईजानने अभिनेत्रीशी संबंधित एक मजेदार किस्साही सांगितला.
सलमान खान म्हणाला की, ‘तेरे नाम’ रिलीज होऊन २० वर्षे झाली आहेत आणि भूमिका चावला अजूनही तशीच आहे. या वेळी सलमानने चित्रपटादरम्यानचा एक किस्साही शेअर केला. सलमान म्हणाला, ‘तेरे नाम’दरम्यान आमच्यात फारशी चर्चा होत नव्हती. आमच्यामध्ये फक्त हाय, हॅलो, ओके, पॅक अप, जेवण करणे आणि काळजी घेणे अशा गोष्टी होत्या. या सगळ्याची रोज पुनरावृत्ती व्हायची आणि आज वीस वर्षांनंतर ‘किसी का भाई किसी की जान’च्या सेटवर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. कारण आमच्यात अजूनही सर्व काही तसेच आहे.
सलमान म्हणाला, ‘तेरे नाम’मधील माझ्या पात्राला भूमिका कदाचित घाबरली होती. कारण तिला वाटत होते की ती जास्त बोलली तर मी तिला मारण्यासाठी मागे लागेन. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये भूमिका चावलानेही सलमानशी संबंधित एक किस्सा शेअर केला. ‘तेरे नाम’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचच्या वेळी भूमिकाने सलमान खानला भाऊ म्हणून हाक मारली होती. ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. त्यानंतर तिने कधीही सलमानला भाऊ म्हणून हाक मारली नाही.
हेही वाचा- कचराकुंडीत सापडलेल्या चिमुरडीला मिथुन चक्रवर्तींनी घेतलेलं दत्तक, दिशानी आता करते ‘हे’ काम
सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. हा २१ एप्रिल रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. यामध्ये अभिनेत्री पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, भूमिका चावला, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल आणि पलक तिवारी यांच्यासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.