Salman Khan: ए.आर.मुरुगदॉस दिग्दर्शित ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चला प्रदर्शित होणार आहे. अवघे सहा दिवस प्रदर्शनासाठी बाकी आहेत. २३, मार्चला ‘सिकंदर’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे सध्या चहूबाजूला चर्चा सुरू आहे. पहिल्यांदाच सलमान खान व रश्मिका मंदानाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुक पाहायला मिळत आहे. पण, सध्या दुसऱ्या बाजूला सलमान खान व त्याची कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरबद्दल चर्चा रंगली आहे.
रविवारी, २३ मार्चला ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला सलमान खान ( Salman Khan ), रश्मिका मंदानासह चित्रपटातील कलाकार उपस्थित राहिले होते. मोठ्या दिमाखात ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या ट्रेलर लॉन्च सोहळ्यानंतर लगेचच सलमान खान फिरायला गेला. कथित गर्लफ्रेंड युलिया वंतूरबरोबर तो दिसला. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या पेजवर सलमान खान ( Salman Khan ) व युलिया वंतूरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. २३ मार्चला रात्री दोघं मुंबईच्या प्राइव्हेट टर्मिनलवर पाहायला मिळाले. यावेळी सलमान खानने निळ्या रंगाचं टी-शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. पापाराझींनी आवाजात देताच सलमान खानने हात वर करून पोज दिली. तर युलिया स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळाली. माहितीनुसार, दोघं जामनगरला फिरायला गेल्याचं म्हटलं जातं आहे.
गेल्या काही वर्षांपासून सलमान खान ( Salman Khan ) आणि युलिया वंतूर एकत्र आहेत. पण, दोघांनी अजूनपर्यंत नात्याबद्दल खुलासा केलेला नाही. दोघांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. ज्यामध्ये व्हिडीओ कॉलवर बोलत असलेल्या युलियाला सलमान खान मागून मिठी मारताना दिसला होता. याच व्हिडीओमधून भाईजान आता सिंगल नसल्याचं समोर आलं होतं. युलिया ही पेशाने गायिका आहे. सलमान खानच्या चित्रपटात तिने गाणं गायलं होतं.
दरम्यान, सलमान खानच्या ( Salman Khan ) कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाकडून सगळ्यांना खूप अपेक्षा आहेत. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट बक्कळ कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्वतः सलमान खानने याबाबत भविष्यवाणी केली आहे. चित्रपट चांगला असो वा वाईट चाहते १०० कोटी पार करतात, असा सलमान खान म्हणाला.