बॉलीवूड अभिनेता सलमान खान किसी का भाई किसी की जान या चित्रपटाच्या अपयशामुळे नाराज असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता सलमाननं काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्याशिवाय सलमाननं पुन्हा एकदा लोकप्रिय दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्याशी हातमिळवणी केली आहे.

अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार- सध्या सलमान खान हिट चित्रपटाच्या शोधात आहे. कारण- त्याच्या मागील काही चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळवता आलेलं नाही. सलमानच्या काही चित्रपटांच्या कथा प्रेक्षकांना आवडलेल्या नाहीत; तर काही चित्रपटांतील भूमिका आवडल्या नाहीत. त्यामुळे आता सलमाननं थेट दिग्दर्शक संजय लीला भन्साळींशी संपर्क साधला आहे आणि ‘इंशाल्लाह’ चित्रपटात काम करण्यासाठी त्यानं सकारात्मक असल्याचं सांगितलं आहे. याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण, भाईजाननं ‘इंशाल्लाह’ चित्रपटात काम केलं, तर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर सलमान आणि आलिया भट्ट ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Taimur and jeh were where while attacking saif ali khan
Saif Ali Khan : हल्ल्यादरम्यान तैमूर आणि जेह कुठे होते? मदतनीसाने पोलिसांना सांगितला घटनाक्रम!
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
saif ali khan fought intruder wife kareena and sons were at home
सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला तेव्हा करीना कपूर कुठे होती? इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत, खरी माहिती आली समोर
Salim Khan
“काही वर्षानंतर…”, हेलन व सलमा खान यांच्यातील नात्यावर बोलताना सलीम खान म्हणाले…
Sessions Court observation while denying bail to driver Sanjay More in Kurla BEST bus accident case Mumbai news
आरोपीच्या निष्काळजीपणामुळेच ‘बेस्ट’ अपघात; चालक संजय मोरे याला जामीन नाकारताना सत्र न्यायालयाचे निरीक्षण
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

हेही वाचा – अजय देवगणने मुंबईत खरेदी केली नवी मालमत्ता; किंमत वाचून बसेल धक्का

हेही वाचा – Video: अभिनेते सयाजी शिंदेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला मोलाचा सल्ला; म्हणाले, “या पक्षाला….”

दरम्यान, चित्रपटाला सतत मिळणाऱ्या अपयशानंतर सलमाननं आपल्या करिअरमध्ये आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो आता SKF प्रॉडक्शन हाउसमध्ये काम करताना दिसणार नाही; जे प्रॉडक्शन हाउस त्याचंच आहे. तसेच सलमान कुटुंबातील सदस्य किंवा मित्रांच्या प्रेमापोटी तो एखाद्या चित्रपटात काम करणार नाही; शिवाय तो आपल्या चित्रपटात नव्या कलाकारांना संधी कमी देईल. याबाबतची माहिती सलमानच्या जवळच्या मित्रानं दिली.

हेही वाचा – Bigg Boss OTT 2 मधून बाहेर पडताना आकांक्षा पुरीला मिळाली अपमानास्पद वागणूक; म्हणाली, “सलमान खानने….”

सध्या सलमान खान ‘बिग बॉस ओटीटी’चं दुसरं पर्व होस्ट करत आहे. याशिवाय तो आगामी चित्रपट ‘टायगर ३’साठी चर्चेत आहे. सलमानच्या या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटात सलमानबरोबर प्रमुख भूमिकांत कतरिना कैफ, इमरान हाश्मीही दिसणार आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Story img Loader