Salman Khan and Shah Rukh Khan attends Devendra Fadnavis Oath Ceremony : विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यावर आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, जेपी नड्डा यांच्यासह भाजपाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते उपस्थित होते.

हेही वाचा : Pushpa 2 Premier : चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्यावर निर्मात्यांची प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाले…

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला राजकीय क्षेत्रासह मनोरंजन तसेच क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी देखील उपस्थिती लावली होती. शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, अर्जुन कपूर, शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी, सचिन तेंडुलकर, विद्या बालन, सिद्धार्थ कपूर, वरुण धवन, अनिल अंबानी, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, विकी कौशल, खुशी कपूर, रुपाली गांगुली, सुधाकर शेट्टी, धवल मेहता, बोनी कपूर, श्रद्धा कपूर या सगळ्यांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती. मात्र, या सोहळ्यादरम्यान एक खास गोष्ट घडली. याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या सुरक्षेत सततच्या धमक्यांमुळे वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे भाईजान बॉलीवूडच्या अनेक पुरस्कार सोहळ्यांपासून सुद्धा दूर होता. अखेर सलमान खान, देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला पोहोचला आणि भर गर्दीतून मार्ग काढत पुढे येत त्याने थेट शाहरुख खानची गळाभेट घेतली.

हेही वाचा : ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेसाठी अशोक सराफांनी निवेदिता यांना दिला होता ‘हा’ सल्ला; काय म्हणाले? वाचा…

शाहरुख-सलमानच्या मैत्रीत मधली काही वर्षे दुरावा आला होता. पण, यानंतर दोघांमधला अबोला दिवंगत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता. दोघांनीही एकमेकांच्या ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये कॅमिओ सुद्धा केले आहेत. शाहरुख-सलमानची एकत्र झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक असतात. अखेर आज अनेक दिवसांनी या दोघांची गळाभेट झाल्याचं पाहून या दोघांचे चाहते देखील सुखावले आहे.

सध्या इंटरनेटवर शाहरुख व सलमान खान यांच्या गळाभेटीचा फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan and shah rukh khan shares warm hug as they attend devendra fadnavis oath ceremony sva 00