‘पठाण’ चित्रपटात अभिनेता सलमान खानने कॅमिओ केल्यावर ‘शाहरुख-सलमान’ ही बॉलीवूडची ‘करण-अर्जुन’ जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली. ‘पठाण’ रिलीज झाल्यावर शाहरुख सुद्धा सलमानच्या ‘टायगर ३’ मध्ये कॅमिओ करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर सलमान खानच्या ‘टायगर ३’बाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “सॉरी भाई, माझे बजेट कमी…” नेटकऱ्याच्या ‘त्या’ कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरने दिले भन्नाट उत्तर

‘टायगर ३’ चे शूटिंग सध्या सुरू असून या चित्रपटात शाहरुख खान ‘पठाण’ आणि सलमान खान ‘टायगर’च्या भूमिकेत दिसणार आहे. ‘टायगर ३’मध्ये शाहरुख-सलमान एका जबरदस्त बाईक सीनचे शूटिंग करणार आहेत. याचे शूटिंग सध्या मालाडमधील मढमध्ये सुरू असून याकरिता निर्मात्यांनी मोठा सेट तयार केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी ‘पठाण’मध्ये या दोघांनी ट्रेनमध्ये अ‍ॅक्शन सीन शूट केला होता.

शाहरुख-सलमानच्या अ‍ॅक्शन सीनसाठी ‘टायगर ३’चे निर्माते तब्बल ३० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती काही मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे. अद्याप या शूटिंगबद्दल निर्मात्यांनी अधिकृतपणे काही माहिती दिलेली नाही. ‘टायगर ३’ चे दिग्दर्शन मनिष शर्मा करीत आहेत. या चित्रपटात सलमानबरोबर कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसतील.

हेही वाचा : “आंसू उसके और आंखें मेरी हो…” कार्तिक-कियाराच्या बहुचर्चित ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सलमानचा ‘एक था टायगर’ २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता त्यानंतर, ‘टायगर जिंदा है’ २०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता आता या ‘टायगर’ सीरिजचा तिसरा भाग प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. ‘टायगर’ चित्रपट यशराज फिल्म्स टस्पाय युनिव्हर्स’चा सुद्धा एक भाग आहे. ‘टायगर ३’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan and shahrukh khan to shoot an extensive bike chase sequence for tiger 3 sva 00