अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा शुक्रवारी ( ५ जुलै ) रात्री पार पडला. या समारंभासाठी खास हॉलीवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बिबरने भारतात उपस्थिती लावली होती. याशिवाय या सोहळ्याला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली होती. येत्या १२ जुलैला हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
संगीत समारंभात सगळ्याच बॉलीवूड कलाकारांनी धमाल केल्याचं पाहायला मिळालं. ९० च्या दशकातील सलमान खानचं “ओ ओ जाने जाना…” हे सुपरहिट गाणं लागताच पार्टीत सर्वांनी डान्स केला. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावेळी अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री पूजा हेगडे, सलमान खान व त्याची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर यांनी एकत्र “ओ ओ जाने जाना…” या लोकप्रिय गाण्यावर डान्स केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
सलमान, पूजा आणि विकी यांनी “ओ ओ जाने जाना…” गाणं लागताच अगदी हुबेहूब हुकस्टेप केली. याशिवाय सलमानने अनंत अंबानीबरोबर रंगमंचावर देखील खास परफॉर्मन्स सादर केला. अनंत अंबानीसह भाईजानने स्कूटरवरून एन्ट्री घेत डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनंत-राधिकाच्या या संगीत सोहळ्याला शाहिद कपूर -मीरा राजपूत, जान्हवी कपूर, जॅकी भगनानी – रकुल प्रीत सिंग, रितेश देशमुख – जिनिलीया, पलक तिवारी, मानुषी, खुशी कपूर, अनन्या पांडे, विकी कौशल, काजल अग्रवाल, अर्जुन कपूर, रणबीर कपूर – आलिया भट्ट, शनाया कपूर, सारा अली खान आणि रणवीर- दीपिका देखील उपस्थित होते.
हेही वाचा : आरक्षणामागच्या समाजभावनेची गोष्ट; ‘आम्ही जरांगे गरजवंत मराठ्यांचा लढा’ चित्रपटाची टीम ‘लोकसत्ता’ कार्यालयात
जस्टिन बिबरचा परफॉर्मन्स या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं. २०१७ नंतर खास अंबानींच्या पार्टीसाठी गायक दुसऱ्यांदा भारतात आला होता. याआधी जामनगरमध्ये पार पडलेल्या प्री-वेडिंग सोहळ्यात रिहाना या लोकप्रिय हॉलीवूड गायिकेने उपस्थिती लावली होती. दरम्यान, आता येत्या १२ जुलैला ही अनंत-राधिका विवाहबंधनात अडकून आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. १४ जुलैपर्यंत लग्नाचे सगळे विधी पार पडणार आहे. या लग्नासाठी खास देश-विदेशातील पाहुणे उपस्थित राहणार आहेत.