अभिनेता सलमान खानचे आगामी चित्रपट खूप चर्चेत आहेत. गेले अनेक महिने त्याचे चाहते ‘टायगर ३’ची वाट पाहत आहेत. सलमान त्याचे चित्रपट प्रामुख्याने ईदला प्रदर्षित करतो. त्यामुळे २०२२ च्या ईदला ‘टायगर ३’ प्रदर्शित होईल असे बोलले जात होते. मात्र, यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आता या चित्रपटाबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आता हा चित्रपट ईदला नव्हे तर एका दुसऱ्या सणाला प्रदर्शित केला जाणार आहे.

आणखी वाचा : ‘हॅग्रिड’च्या आठवणीत हॅरी पॉटर आणि हर्माईनी भावुक, पोस्ट शेअर करत वाहिली श्रद्धांजली

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
IMDB most anticipated movie
२०२५ मध्ये ‘या’ २० चित्रपटांची सिनेप्रेमींना आहे प्रतीक्षा, सलमान खान पासून ते अक्षय कुमार पर्यंत ‘या’ स्टार्सच्या सिनेमांचा आहे समावेश
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
Mahakumbh 2025 Grah Yog, subh yog horoscope
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्याच्या मुहूर्तावर ११४ वर्षांनी जुळून आला अद्भुत योग; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल, हाती लागणार पैशांचे घबाड
baby john ott release
Baby John Ott Release : वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ ओटीटीवर पाहता येणार, कुठे आणि कधी? जाणून घ्या

दिवाळीपूर्वीच सलमान खानने मोठी घोषणा केली आहे. त्याने त्याचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ ची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. ‘टायगर ३’ पुढील वर्षी एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार होता पण आता त्याच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. सलमान खानने ‘टायगर ३’ मधील नवीन लूक शेअर करताना ही माहिती दिली आहे. सलमानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट पुढच्या वर्षी दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. ‘टायगर’ फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागात सलमान खानबरोबर अभिनेत्री कतरिना कैफही दिसणार आहे. या दोघांच्या जोडीला प्रत्येक वेळी प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे आणि यावेळीही चाहते या दोघांना एकत्र पाहण्यासाठी फार उत्सुक आहेत. ‘टायगर ३’ मधून समोर आलेल्या नव्या लूकमध्ये सलमान खानचे फक्त डोळे दिसत आहेत.

अनेक वर्षांपासून ईदला सलमान खानचा चित्रपट पाहायला मिळतो. पण गेल्या वर्षी कोरोनामुळे चित्रपटगृहे बंद असल्याने प्रेक्षकांना सलमानचा चित्रपट पाहता आला नाही. तसेच यंदाच्या ईदलाही सलमानने त्याचा चित्रपट प्रदर्शित केला नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी ईदला ‘टायगर ३’ प्रदर्शित होणार असे त्याच्या चाहत्यांना वाटत होते. पण पुढील वर्षीच्या ईदलाही सलमान हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याने चाहत्यांची थोडी निराशा झाली.

हेही वाचा : तब्बल १८ वर्षानंतर शाहरुख खान ‘या’ दिग्गज कलाकारांबरोबर शेअर करणार स्क्रीन

आता अखेर ‘टायगर ३’ हा चित्रपट पुढील वर्षी दिवाळीला प्रदर्शित करण्याचा निर्णय त्याने त्यांनी घेतला आहे. सध्या तरी निर्मात्यांनी ‘टायगर ३’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचे कारण स्पष्ट केले नसले तरी सलमानचे आधीचे चित्रपट अपयशी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची कुजबुज सोशल मीडियावर सुरु झाली आहे. तर काही जण या चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम राखडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलत आहेत.

Story img Loader