बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि अर्जुन कपूरमधील वाद सगळ्यांनाच माहिती आहे. समोरासमोर ते कधी भांडले नसले तरी त्यांच्यात शीतयुद्ध सुरूच असतं. दोघांनी कधीही आपल्या वादाबद्दल उघडपणे भाष्य केलं नाही; पण आता दोघांमधले वाट मिटले असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- आरवला वडील अक्षय कुमारचे चित्रपट कसे वाटतात? अभिनेत्याने केला मोठा खुलासा; म्हणाला, “बकवास…”

सलमाननं नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करीत सलमाननं आयसीसी विश्वचषकातील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली आहे. या सामन्यादरम्यान तो त्याच्या चित्रपटाचं प्रमोशनही करणार आहे. अर्जुन कपूरनं या पोस्टला लाइक केलं आहे. सलमानच्या या पोस्टला अर्जुन कपूरनं लाइक केल्यामुळे दोघांमधील वाद मिटल्याच्या चर्चा सगळीकडे सुरू आहेत.

अर्जुन आणि सलमानचा वाद नेमका सुरू कसा झाला?

एका कार्यक्रमादरम्यान सगळ्यांसमोर सलमाननं अर्जुनकडे दुर्लक्ष केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान अर्जुनवर यासाठी नाराज होता की, तो त्याचा भाऊ अरबाजची पूर्वाश्रमीची पत्नी मलायका अरोराला डेट करीत होता. त्यानंतरच सलमान आणि अर्जुनमध्ये बिनसलं असल्याचं सांगण्यात येतं. मात्र, दोघांनी कधीच याबाबत उघडपणे भाष्य केलं नव्हतं. आता सलमानच्या पोस्टवर अर्जुननं लाइक केल्यामुळे दोघांमधील दुरावा मिटला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा-आलिया भट्टने जयदीप अहलावत यांचा नंबर ब्लॉक करण्याची दिलेली धमकी; अभिनेत्याचा खुलासा, म्हणाले, “मला कधीच…”

काही दिवसांपूर्वी सलमान आणि प्रसिद्ध गायक अरिजित सिंहमध्येही पॅचअप झाल्याची बातमी समोर आली होती. अरिजितला सलमानच्या घरातून कारमधून बाहेर पडताना पाहण्यात आलं होतं. त्यासंबंधीचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तसेच सलमानच्या आगामी चित्रपटात अरिजित गाणं गाणार असल्याच्याही चर्चा सुरू आहेत.