Salman Khan arrives at Baba Siddique’s residence : सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांची गेल्या अनेक वर्षांपासून घनिष्ट मैत्री होती. दरवर्षी सिद्दीकी कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला संपूर्ण बॉलीवूड उपस्थित राहायचं. शनिवारी रात्री उशिरा बाबा सिद्दीकींवर हल्ला झाल्याची बातमी समजल्यावर भाईजानने ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाचं शूटिंग त्वरीत थांबवलं आणि तो लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला.

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली. अज्ञातांनी गोळ्या झाडल्यावर बाबा सिद्दीकींच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लगेच लीलावती रुग्णालयात दाखल केलं मात्र, त्याआधीच त्यांनी प्राण गमावले होते. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात एक सोशल मीडियावर पोस्ट देखील व्हायरल झाली आहे. ही पोस्ट बिश्नोई गँगकडून शेअर करण्यात आल्याचा दावा यामधून करण्यात आला आहे. या पोस्टची सत्यता पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. या कथित पोस्टमधून सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे थोडे दिवस शूटिंग रद्द करून सलमानला घरी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या मात्र, अभिनेता शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयात आणि आज ( १३ ऑक्टोबर ) बाबा सिद्दीकी यांच्या निवासस्थानी दाखल झाला आहे.

Singham Again Box Office Collection Day 5
‘सिंघम अगेन’ चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत कमावले तब्बल ‘इतके’ कोटी, या मल्टिस्टारर सिनेमाचं एकूण बजेट किती? जाणून घ्या…
14th November Daily Astrology in Marathi
१४ नोव्हेंबर पंचांग: वैकुंठ चतुर्दशीला मेष ते मीनपैकी…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

हेही वाचा : Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या दोन पैकी एका मारेकऱ्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसऱ्याची चाचणी होणार; न्यायालयाचा निर्णय

सलमानसह ( Salman Khan ) त्याचा लहान भाऊ सोहेल खान, अर्पिता, अरबाजची दुसरी पत्नी शूरा, भाईजानची जवळची मैत्रीण लुलिया हे सगळे खान कुटुंबीय बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये सलमान खानला ( Salman Khan ) आजूबाजूच्या सर्व लोकांनी घेरल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे भाईजानच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. “बिश्नोई गँगमुळे सलमान खानने त्याच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं”, “सलमानला उगाच टार्गेट करत आहेत”, “सलमान खान आणि टीमने काळजी घेणं आवश्यक आहे असं सार्वजनिक ठिकाणी खुलेआम फिरणं सध्या घातक आहे.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा : Baba Siddique : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, “शरद पवारांना इतक्या गंभीर घटनेनंतरही खुर्ची दिसते…”

Salman Khan
( Salman Khan )

दरम्यान, बाबा सिद्दीकींच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर, तिसरा आरोप अद्याप फरार आहे. गुरुमीत सिंग, धर्मराज कश्यप अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यापैकी न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर धर्मराजने त्याचं वय १७ वर्षे सांगितल्याने त्याची हाडांसंदर्भातली चाचणी करण्यात येणार आहे.