‘बिग बॉस’ या बहुचर्चित शोच्या सुत्रसंचालनाची धुरा गेली कित्येक वर्ष अभिनेता सलमान खान सांभाळत आहे. पण आता एक नवा ट्विस्ट आला आहे. सलमानला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यानंतर या शोच्या सुत्रसंचालनाची धुरा कोण सांभाळणार याबाबत प्रश्नचिन्ह होतं. आता पुढील काही दिवस दिग्दर्शक करण जोहर शोच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळणार आहे. सलमानला डेंग्यू झाला म्हटल्यावर त्याचे चाहते चिंतेत होते. परंतु आता सलमान लवकर बरा होत असल्याचे समोर आले आहे. नुकतीच त्याने आयुष शर्माच्या वाढदिवसाला हजेरी लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : “आम्ही जिथे जातो तिथे…”; दुबईत दिवाळी साजरी करण्यावरून टोमणे मारणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीचे सडेतोड उत्तर

सलमान खान आजारी असल्याने त्याचे चाहते सलमानची काळजी करत होते. पण दोन-तीन दिवसांपूर्वी सलमानच्या मॅनेजरने त्याच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. “सलमान खान आता ठिक आहे. तसेच दिवाळीनंतर तो चित्रीकरणाला सुरुवात करेल,” असं सलमानच्या मॅनेजरने सांगितलं होतं.

त्यानंतर आता नुकतीच त्याने आयुष शर्माच्या वाढदिवाच्या पार्टीत हजेरी लावली. यावेळी त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि गडद लाल रंगाची पॅन्ट परिधान केली होती. सलमान खानला लोकांमध्ये पुन्हा मिसळलेलं पाहून त्याच्या चाहत्यांच्या जीवात जीव आला. सलमान खानचे या पार्टीतले फोटो व्हायरल झाल्यावर त्याच्या तब्येतीत आता सुधारणा झाली असून तो बरा आहे याची त्याच्या चाहत्यांना खात्री पटली आहे. त्यामुळे आता त्याचंड चाहते सुखावले आहेत.

हेही वाचा : Bigg Boss 16: करण जोहरवर भेदभाव केल्याचा आरोप, सलमान खानकडे सूत्रसंचालन द्या; नेटकऱ्यांची मागणी

सलमानला डेंग्यू झाला आहे समजल्यानंतर पुढील काही दिवस तरी ‘बिग बॉस १६’चं सुत्रसंचालन तो करणार नसल्याचं समोर आलं. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही नाराजी होती. पण आता दिवाळीनंतर तो पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या कामाला सुरुवात करणार असल्याचं समोर आलं आहे.