बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. या वर्षाच्या सुरुवातीला सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता, याबरोबरच त्याच्या पनवेलजवळच्या फार्महाऊसमध्ये दोन अज्ञातांनी शिरण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सलमान खान मोठ्या चर्चांचा भाग बनला होता. याबरोबरच काही दिवसांपूर्वी सलमान खानने लॉरेन्स बिश्नोई गँग मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा जबाब पोलिसांना दिला होता. त्यामुळे सलमान खान मोठ्या चर्चेत आला होता. मात्र, २०१० मध्ये सलमान खान(Salman Khan) एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलमान खानने एका लहान मुलीला बोन मॅरो ट्रान्सप्लांट (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) करत तिचा जीव वाचवला होता. २०१० च्या झी न्यूज रिपोर्टनुसार, डॉक्टर सुनील पारेख हे मॅरो डोनर रजिस्ट्री इंडिया (MDRI) चे प्रमुख होते. त्यांनी म्हटले होते की, खूप लोक या आजाराचा सामना करत आहेत. मला सलमान खानचे आभार मानायचे आहेत, त्याने एका मुलीला मदत केली. चार वर्षांपूर्वी सलमानने पूजाविषयी वाचले होते. या लहान मुलीला बोन मॅरोची गरज होती. तो त्याच्या संपूर्ण फूटबॉल टीमसह बोन मॅरो दान करण्यासाठी आला होता. दुर्दैवाने त्याची टीम शेवटच्या क्षणी मागे सरली, मात्र सलमान खान आणि अरबाज खान यांनी आपला निश्चय सोडला नाही आणि ते बोन मॅरो दान करणारे पहिले दाते ठरले.

बोन मॅरो दान करण्याविषयी भारतातील समस्यांविषयी बोलताना सलमान खानने त्यावेळी म्हटले होते की, आपल्याकडे बोन मॅरो दान करणारे फक्त ५००० दाते आहेत. भारतात ही समस्या असण्याचे कारण बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल जागरुकता नाही असे नाही, तर आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण ही सुद्धा समस्या आहे. हे फक्त रक्त चाचणी केल्यासारखे आहे, याला जास्त वेळ जात नाही. मला माहीत आहे, काही लोक रक्त चाचणी करायलादेखील घाबरतात. मात्र, ही वेळ थोडेसे धाडस दाखवण्याची आहे, यामुळे खूप मोठा बदल होऊ शकतो.

हेही वाचा: “चुकीच्या व्यक्तीसोबत राहण्यापेक्षा…”, पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केल्यावर मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान, सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या घरावर हल्ला झाल्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. याप्रकरणी बॉलीवूडच्या भाईजानने लॉरेन्स बिश्नोई गँगकडून मला सतत जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. ही गँग मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan became first bone marrow transplant doner save little girl life nsp
Show comments