बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आज वाढदिवस आहे. हटके स्टाइलने चाहत्यांना वेडं करुन सोडणारा सलमान ५८व्या वर्षात पदार्पण करत आहे. बिवी हो तो ऐसी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सलमानने एक सो एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. अनेक तरुणींच्या गळ्यातील तो ताईत झाला होता. आजही त्याचे फॅन फॉलोविंग प्रचंड आहे.

लाखो दिलांच्या दिलावर राज्य करणारा सलमान कोटींचा मालक आहे. सलमान खान कुटुंबियांसह मुंबईत तीन मजली बंगल्यात राहतो. या बंगल्याची किंमत सुमारे १०० कोटी इतकी आहे. याव्यतिरिक्तही मुंबईत सलमानच्या नावावर अनेक फ्लॅट आहेत. पनवेलमध्येही निसर्गाच्या सानिध्यात सलमानचं एक फार्म हाऊस आहे. करोना लॉकडाऊनमध्ये सलमान याच फार्म हाऊसवर होता. १५० एकरमध्ये पसरलेल्या या फार्म हाऊसची किंमत ८० कोटी इतकी आहे.

chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
abhijeet bhattacharya shah rukh khan
शाहरुख खानला ‘या’ नावाने चिडवायचे इतर अभिनेते, अभिजीत भट्टाचार्य यांनी केला खुलासा; म्हणाले, “दुबईतील पुरस्कार सोहळ्यात…”
Bollywood actor Shahrukh khan wear 63000rd Hermes necklace at son abram school annual function
Shahrukh Khan: मुलगा अबरामच्या शाळेतील कार्यक्रमात शाहरुख खानचा खास लूक, गळ्यातल्या नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क
PMP , Sawai Gandharva Festival, Special Bus Service of PMP,
सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीची विशेष बससेवा, कोणत्या मार्गांवरून कधी धावणार बस ?
Space in Ambernath for waste disposal left unused for ten years Mumbai news
१० कोटींची ओसाडभूमी ; कचरा विल्हेवाटीसाठी अंबरनाथमधील जागा दहा वर्षे विनावापर, बदलत्या तंत्रज्ञानामुळे गरजही नष्ट
Technical work Sindhi railway station, trains cancelled,
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…
The proportion of supplementary demands compared to the budget is 20 percent
अर्थसंकल्पाच्या तुलनेत पुरवणी मागण्यांचे प्रमाण २० टक्क्यांवर; यंदाच्या वर्षात १ लाख ३० हजार कोटींच्या मागण्या

हेही वाचा>>‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिक झळकणार मोठ्या पडद्यावर; सलमान खानच्या चित्रपटातून करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

हेही वाचा>>‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम समीर चौगुलेंचा नवीन चित्रपट; पोस्टर शेअर करत म्हणाले…

सलमान खानकडे गाड्यांचं लक्झरी कलेक्शन आहे. ऑडी, बीएमडब्ल्यू, जॅग्वार, रेंज रोव्हर, लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज या महागड्या गाड्या त्याच्याकडे आहेत. सुझुकी, यमाहा, कावासाकी हे बाईकचं कलेक्शनही सलमानकडे आहे.

हेही पाहा>>Photos: मेकअप रुम ते मालिकेचा सेट; शीझान खानने शेअर केलेले तुनिषा शर्माबरोबरचे ‘ते’ फोटो

सलमान महिन्याला १६ ते २० कोटींची कमाई करतो. जाहिरात, चित्रपट आणि इतर व्यावसायातून तो वर्षभराला २०० कोटी कमावतो. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान ३८० डॉलर मिलियन संपत्तीचा मालक आहे. म्हणजेच भारतीय रुपयानुसार सलमानकडे तीन हजार कोटींहून अधिक संपत्ती आहे.

Story img Loader