अभिनेता आयुष शर्मा आणि सलमान खानची बहीण अर्पिता खान शर्मा यांच्या लग्नाला जवळपास १० वर्षे झाली आहेत. या जोडप्याने वर्षभर एकमेकांना डेट केल्यावर लग्नगाठ बांधली होती. आपल्या १० वर्षांच्या संसारात या दोघांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अर्पिताला रंगावरून, वजनावरून ट्रोल केलं जातं, आयुषलाही पत्नीच्या दिसण्यावरून बऱ्याचदा नकारात्मक कमेंट्स येतात. इतकंच नाही तर या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवाही अनेकदा येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१९ मध्ये अचानक हे जोडपं घटस्फोट घेणार असल्याच्या अफवा पसरू लागल्या, ते ऐकून धक्का बसला होता, असं आयुषने सांगितलं. ‘न्यूज १८’ ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “माझ्या आयुष्यात माझ्याबद्दल अफवा पसरवण्याइतपत कोणालाच रस नाही. पण मला एक छोटा प्रसंग आठवतो. मी माझ्या मुलाला डोसा खाऊ घालण्यासाठी बाहेर पडलो होतो आणि तिथून परत येताना मला पापाराझींनी अडवलं आणि विचारलं की अर्पिता आणि मी घटस्फोटासाठी अर्ज करत आहोत का?”

भव्य सेट, खरे दागिने अन्…; संजय लीला भन्साळींनी घेतले ६० कोटी, ‘हीरामंडी’चं बजेट किती? कोणाला किती मानधन मिळालं?

हा प्रश्न ऐकून धक्का बसला पण तरीही आयुष आणि अर्पिता यावर हसू लागलेत. “मला खूप आश्चर्य वाटलं! मी माझ्या मुलाला खायला बाहेर नेलं अन् मला आमच्या घटस्फोटाच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागलं. घरी आल्यावर मी अर्पिताला विचारलं की ती मला घटस्फोट देणार आहे का? आणि त्यावर मग आम्ही बराच वेळ हसत होतो,” असं आयुषने सांगितलं.

ओटीटीवरील सर्वात भयावह सिनेमे अन् वेब सीरिजची यादी, ‘या’ कलाकृती पाहून स्वतःच्या सावलीचीही वाटेल भीती

मागच्या १०-११ वर्षात अर्पिता आयुषला त्याच्या करिअरमध्ये खंबीरपणे साथ देत आहे. काम चांगलं नसेल तर ती स्पष्ट शब्दांत टीकाही करते, असंही आयुष म्हणतो. “अर्पिता खूप कठोर टीकाकार आहे. पण तिचे शब्द कठोर असले तरी ती खूप प्रामाणिक आहे. ती अशी व्यक्ती आहे जी अतिशय ऑब्जेक्टिव्हली चित्रपट पाहते. मी ज्या प्रकारचे चित्रपट करतो त्या तुलनेत तिची आवड वेगळी आहे. तिला माहित आहे की मला लोकांसाठी कमर्शिअल चित्रपट बनवायला आवडतात, पण तिला मात्र सत्य कथांवर आधारित चित्रपट पाहायला जास्त आवडतं,” असा आयुषने खुलासा केला.

या आठवड्यात OTT वर आलेत जबरदस्त चित्रपट अन् वेब सीरिज, वीकेंड मनोरंजक करण्यासाठी वाचा कलाकृतींची यादी

१३ वर्षांपूर्वी २०११ मध्ये आयुष आणि अर्पिताची प्रेमकहाणी एका पार्टीत सुरू झाली होती. आयुषने सुरुवातीला अर्पितासमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या, तर अर्पिताने त्याला उत्तर देण्याआधी वेळ घेतला होता. नंतर या दोघांचं लग्न वर्षभराने २०१४ साली लग्न झालं. या जोडप्याला मुलगा अहिल आणि मुलगी आयत अशी दोन अपत्ये आहेत. लवकरच या दोघांच्या लग्नाला १० वर्षे होतील.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan brother in law aayush sharma reacts on divorce rumours with wife arpita khan hrc