मनोरंजन सृष्टीतील ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत गेले अनेक दिवस तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्याचं नुकतंच समोर आलं. सात महिन्यांपूर्वी तिने आदिल खानशी निकाह केला. परंतु त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतरही आदिलने त्यांच्या लग्नाबाबत मौन धरले होते. या दरम्यान राखीला खूप मानसिक त्रास झाल्याचं तिने सांगितलं. पण आता नुकतंच आदिलने त्यांचं लग्न झाल्याचं कबूल केलं. या सगळ्यात सलमान खानने मध्यस्थी केल्याचं आता समोर आलं आहे.

राखी सावंतने आठवड्याभरापूर्वी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचं लग्न झालं असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर आदिलने राखीबरोबरच्या लग्नाला दुसरा देणं टाळलं होतं. या दरम्यान सलमान खानने आदिलशी बोलून त्याची समजूत काढली.

ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
man killed wife due to suspicion of having an immoral relationship
नागपूर : प्रेमविवाहाचा करुण अंत! अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा खून

आणखी वाचा : नेहमी स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या शाहरुख खानच्या मुलीचा नो मेकअप लूक पाहिलात का? सुहानाला बघून नेटकरी आवक्

राखी आणि आदिलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सलमान खानने माझा संसार वाचवल्याचं राखीने सांगितलं. राखी म्हणाली, “सलमान माझा भाऊ आहे आणि आदिल त्याचा मेहुणा आहे. त्याने आदिलला फोन केला होता. त्याने व्हिडीओ पाहिले आणि विचारलं हे सगळं काय आहे?” पुढे सलमान आणि आदिलमध्ये काय संभाषण झालं हे सांगताना आदिल म्हणाला, “त्यांनी मला सांगितलं की तुमचं लग्न झालं आहे हे कबूल कर. तुला कबूल करायचं असेल तर ते कबूल कर नाहीतर सरळ नकार दे. पण पुढे जे काय होईल त्याला सामोरं जा.”

हेही वाचा : राखी सावंतला दुसऱ्याबरोबर रोमान्स करताना पाहून भडकला आदिल खान, प्रकरण गेले मारामारीपर्यंत

दरम्यान २०१९ मध्ये राखीने एनआरआय असलेल्या रितेशशी लग्न केलं होतं. हे दोघं ‘बिग बॉस’मध्येही एकत्र सहभागी झाले होते. या शोदरम्यान त्यांच्यात विविध कारणांनी वाद निर्माण झाला आणि त्यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर २०२२ च्या मे महिन्यात तिने आदिलशी निकाह केला.

Story img Loader