Salman Khan Rushes To Lilavati Hospital : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी वांद्रे पूर्व येथील खेरवाडी सिग्नलजवळ त्यांच्यावर गोळीबार केला. बाबा सिद्दीकी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींचे खास मित्र होते. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान आणि बाबा सिद्दीकी यांच्यात घट्ट मैत्री होती. त्या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं जायचं. त्यामुळे सिद्दीकींच्या हत्येची बातमी ऐकताच सलमान खानने रुग्णालयात धाव घेतली. बाबा सिद्दीकींच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी सलमान लीलावती रुग्णालयात पोहोचल्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.

बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीत संपूर्ण बॉलीवूड अवतरलेलं असायचं. विशेष म्हणजे यापैकीच एका पार्टीत बाबा सिद्दीकींनी सलमान-शाहरुखमधले वाद मिटवून त्यांना एकत्र आणलं होतं. त्यामुळे दोघांसाठी ते खूपच खास होते. रात्री उशिरा बाबा सिद्दीकींच्या एन्काऊंटरची बातमी कळताच सलमानने ( Salman Khan ) सगळं सोडून लीलावती रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी अभिनेता ‘बिग बॉस’चं शूटिंग करत होता.

हेही वाचा : Baba Siddique Shot Dead : राजकारणातला अजातशत्रू! गोळीबारात ठार झालेले बाबा सिद्दीकी कोण होते?

सलमान खान पोहोचला लीलावती रुग्णालयात…

सलमान खान सध्या ‘बिग बॉस’ हिंदीच्या १८ व्या पर्वाचं शूटिंग करत आहे. दर वीकेंडला तो स्पर्धकांची शाळा घेण्यासाठी जातो. शनिवारी होस्टिंग सुरू असताना बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी आहे. यावेळी भाईजानने ( Salman Khan ) त्वरित शूटिंग थांबवलं आणि तो लीलावती रुग्णालयात पोहोचला. बाबा सिद्दीकींवर अज्ञातांनी गोळ्या झाडल्यावर त्यांना लगेच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र, त्याआधीच त्यांनी प्राण गमावले होते.

हेही वाचा : Baba Siddique : “बाबा सिद्दीकींच्या हत्येची बातमी दुर्दैवी, कायदा आणि सुव्यवस्थेची दुर्दशा..”; सुप्रिया सुळेंची पोस्ट

हेही वाचा : Baba Siddique Shot Dead: “माझं देवेंद्र फडणवीसांना कळकळीचं आवाहन आहे की…”, छगन भुजबळांची सोशल पोस्ट व्हायरल!

दरम्यान, सलमान ( Salman Khan ) लीलावती रुग्णालयात दाखल झाल्याचे फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर त्याने बिग बॉसचं शूटिंग रद्द केलं आहे. याशिवाय या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. लीलावतीच्या दिशेने जाणारा सलमान यावेळी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.