सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर लोक एकमेकांच्या घरी दर्शनाला जात आहेत. यामध्ये सेलिब्रिटींचाही समावेश आहे. सुपरस्टार सलमान खान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अभिनेता आयुष शर्मा आणि अर्पिता खान शर्मा यांच्या घरी गणपती उत्सवासाठी पोहोचले.
सलमान खान व मुख्यमंत्री शिंदे एकत्र अर्पिताच्या घरी पोहोचले. यावेळी सलमान त्याच्या बहिणीच्या घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना मुख्यमंत्री शिंदेंबरोबर पोज देताना दिसला. सलमान आणि सीएम शिंदेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी सलमानने काळी पँट व निळा शर्ट परिधान केला होता. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी पांढऱ्या रगांचे कपडे परिधान केले होते.

देशभरात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांच्याच घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. मुंबईत गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. बॉलीवूड इंडस्ट्रीतही गणेशोत्सवाची जोरदार धूम पाहायला मिळत आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी आपल्या घरी गणपतीचे स्वागत केले आहे.
३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…”
सलमान खान, शाहरुख खान, कार्तिक आर्यन, शिल्पा शेट्टी, मनीष मल्होत्रा, अर्पिता खान व आयुष शर्मा, सारा अली खान यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. याशिवाय अनेक सेलिब्रिटी लालबागचा राजाच्या दर्शनाला जाताना दिसत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले आहे, तिथेही मोठ्या संख्येने बॉलीवूडकर दर्शनासाठी जात आहेत.