Salman Khan Ex GirlFriend : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली असून, सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान हे दोघंही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे घट्ट मित्र होते. याशिवाय बिश्नोई गँगने अनेकदा सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे सिद्दीकींच्या हत्येनंतर सध्या भाईजानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने सोशल मीडियावर लॉरेन्स बिश्नोईसाठी एक पोस्ट शेअर करत त्याला मेसेज दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोमी अलीने इन्स्टाग्रामवर लॉरेन्स बिश्नोईचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक मेसेज दिला आहे. या पोस्टद्वारे अभिनेत्रीने लॉरेन्सबरोबर फोन कॉलवर संवाद साधण्याची इच्छा आहे असं म्हटलं आहे. सोमी अलीने तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय जाणून घेऊयात…

हेही वाचा : Miss India चा खिताब जिंकणारी उज्जैनची निकिता पोरवाल आहे तरी कोण? अवघ्या १८ व्या वर्षी केलेली करिअरची सुरुवात, जाणून घ्या…

अभिनेत्री सोमी अलीची पोस्ट

सोमी अली लिहिते, “लॉरेन्स बिश्नोईसाठी हा माझा थेट मेसेज आहे. नमस्ते लॉरेन्स भाई…मी असं ऐकलंय आणि सध्या बघतेय की, तू जेलमधून झूम कॉल वगैरे करतोस. मलाही तुझ्याशी संवाद साधायचा आहे. मला कृपा करून सांग हे कसं शक्य होईल? संपूर्ण जगात मला राजस्थान हे शहर खूप आवडतं. मला तिथल्या एका मंदिरात पूजा करण्यासाठी जायचंय. पण, त्याआधी आपला एक झूम कॉल होऊन जाऊदे. विश्वास ठेव, माझ्याशी बोलून तुझा फायदाच होईल. तुझा मोबाइल नंबर पाठव…तुझे खूप उपकार होतील धन्यवाद!” या पोस्टमुळे अभिनेत्री पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचं कुटुंब चिंतेत! भाऊ अरबाज म्हणाला, “सध्या बऱ्याच गोष्टी…”

सोमी अलीची पोस्ट ( Salman Khan )

दरम्यान, सोमी अली आणि सलमान खान ( Salman Khan ) खूप वर्षांआधी रिलेशनशिपमध्ये होते. सलमान आणि संगीता बिजलानी यांचं लग्न मोडण्यास सोमी अली कारणीभूत ठरली होती. यानंतर, पुढे काही वर्षांनी सोमी आणि सलमानचं नातं देखील तुटलं. यावेळी अभिनेत्रीने त्याच्यावर गंभीर आरोप देखील केले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या राय आणि सलमान खान ( Salman Khan ) या दोघांचे सूर जुळल्यावर सोमीने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan ex girlfriend somy ali direct message to lawrence bishnoi shares post sva 00