Baba Siddique Death Salman Khan Family Pays Last Respect : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राजकीय विश्वात एकच खळबळ उडाली. वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात दूर्गा पूजेदरम्यान ही घटना घडली. आज ( १३ ऑक्टोबर ) बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तान याठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती त्यांचे पुत्र झीशान सिद्दीकी यांनी एक्स पोस्ट शेअर करत दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बाबा सिद्दीकी यांचे अनेक बॉलीवूड कलाकारांशी विशेषत: सलमान खान व त्याच्या कुटुंबीयांशी खूप चांगले संबंध होते. त्यांच्या हत्येबद्दल समजताच भाईजानने ‘बिग बॉस’च्या १८ व्या पर्वाचं शूटिंग त्वरीत थांबवलं आणि थेट लीलावती रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, झहीर इक्बाल, वीर पहारिया, संजय दत्त यांसारखे बरेच सेलिब्रिटी रात्रीच रुग्णालयात पोहोचले होते.

हेही वाचा : Salman Khan – बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ; बिश्नोई गँगची धमकी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठा बंदोबस्त

बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनासाठी खान कुटुंबीय पोहोचले

बाबा सिद्दीकींच्या मृत्यूनंतर रितेश देशमुखसारख्या अनेक बॉलीवूडकरांनी पोस्ट शेअर करत या घटनेतील आरोपींना शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. हा हल्ला झाल्यानंतर पहाटे साडे पाचच्या सुमारास बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंधेरीतील कूपर रुग्णालयात आणण्यात आला. यानंतर अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांना अखेरचा निरोप देऊन बाबा सिद्दीकी यांच्या राहत्या घरी शेवटची प्रार्थना केली जाईल असं झीशानने पोस्टमध्ये सांगितलं होतं. यानुसार आता खान कुटुंबीय बाबा सिद्दीकींच्या घरी पोहोचले आहेत.

सलमान खानचा ( Salman Khan ) लहान भाऊ सोहेल खान, बहीण अर्पिता, भाईजानची जवळची मैत्रीण लुलिया वंतुर, अरबाजची दुसरी पत्नी शूरा खान असे सगळे खान कुटुंबीय एकत्र बाबा सिद्दीकींच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

हेही वाचा : Salman Khan on Baba Siddique: पंतप्रधान मोदी यांच्यासमोर सलमान खाननं घेतलं होतं बाबा सिद्दीकींचं नाव; म्हणाला, “माझं मतदान…”

दरम्यान, सलमान ( Salman Khan ) यावेळी कुटुंबीयांबरोबर उपस्थित नव्हता. कुटुंबीय पोहोचल्यावर तो मागून बाबा सिद्दीकींच्या घरी दाखल झाला आहे. हत्येनंतर भाईजानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.