बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटातील सगळे कलाकार प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. सध्या आयपीएल २०२३ सुरू आहे, अशातच एका कार्यक्रमात सलमान खानने त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वनिता खरातचा पती सुमित लोंढे काय काम करतो? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “तो एका कंपनीत…”

अभिनेता सलमान खानने त्याच्या आगामी ‘किसी का भाई, किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयपीएलच्या मंचाचा वापर केला. या एपिसोडमध्ये तो स्टार स्पोर्ट्सवर काही मुलांसोबत दिसला. ज्यात तो मुलांबरोबर मजेदार गप्पा मारताना तसेच काही मजेदार गोष्टी करताना दिसला. यावेळी त्याने मुलांना धोनीबद्दल तसेच विराट कोहलीच्या फिटनेसबद्दल माहिती दिली.

“तुझ्यापेक्षा जिनिलीया…” विलासराव देशमुख यांना होतं सूनेचं कौतुक, रितेश देशमुखने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “आज ते असते तर…”

खरं तर, सलमान खानने मुलांना विचारले की ‘उत्तरेकडील एक मुलगा दक्षिणेत चेन्नईचा कर्णधार म्हणून आला, तो कोण होता’, त्याचं उत्तर देत एका मुलाने एमएस धोनीचं नाव घेतलं. त्यानंतर सलमान खान म्हणाला, ‘धोनी माझा आवडता क्रिकेटपटू आहे. एवढंच नाही तर धोनी चेन्नई सुपरकिंग्सला स्पेशल बनवणार आहे,’ असं मत सलमानने व्यक्त केलं.

पुढे सलमान म्हणतो, आणखी एक गोष्ट ऐका…एक मुलगा आहे जो फक्त त्याच्या खेळावर लक्ष केंद्रित करतो आणि तो सर्वात फिट क्रिकेटपटू बनला आहे, त्यावर मुलं विराट कोहलीचे नाव घेतात. त्यावर सलमान खान म्हणतो, ‘ही बॅक विथ द बँग’. दरम्यान, यंदाच्या हंगामात विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी दोघांचाही चांगला खेळ पाहायला मिळत आहे. धोनी चेन्नई सुपरकिंग्सकडून तर विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आयपीएल खेळतात.