सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुचर्चित बहुप्रतीक्षित चित्रपट ‘टायगर ३’ १२ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदरपासूनच प्रेक्षकांमध्ये ‘टायगर ३’बाबत क्रेझ बघायला मिळाली होती. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. मात्र, त्यानंतर ‘टायगर ३’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट पाहायला मिळाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टायगर ३ ने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षाही कमी कमाई केली असली तरी सलमानचे चाहते या चित्रपटाला ओटीटीवर बघण्यास उत्सुक आहेत. सलमान कतरिनाचा टायगर ३ OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित करण्यात आला आहे. सलमान खानने याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा- Video: लेकीच्या लग्नात आमिर खानचा ‘ठरकी छोकरो’वर जबरदस्त डान्स, किरण रावसह थिरकला अभिनेता, व्हिडीओ व्हायरल

टायगर ३’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ४४.५ कोटीची कमाई केली होती. पहिल्या दिवसाची कमाई पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईत घट बघायला मिळाली होती. पहिल्या आठ दिवसांमध्ये या चित्रपटाने २२९.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. आत्तापर्यंत या चित्रपटाने भारतात २८२.७९ कोटींची कमाई केली आहे तर जगभरात टायगर ३ ने ४६४ कोटींचा व्यवसाय केला आहे.

‘टायगर ३’मध्ये सलमान खान, कतरिना कैफबरोबर इमरान हाश्मीची मुख्य भूमिका आहे. इमरानने या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि शाहरुख खानने कॅमिओ केला आहे. ‘टायगर’ व ‘टायगर जिंदा है’प्रमाणे ‘टायगर ३’मध्येही प्रेक्षकांना सलमान आणि कतरिनाचा अ‍ॅक्शन लूक बघायला मिळाला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan film katrina kaif film tiger 3 ott release prime video dpj