बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिल रोजी) पहाटे दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने घेतली आहे. सलमानच्या घरावर हल्ला झाल्यानंतर हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं त्याचे वडील सलीम खान म्हणाले. याच दरम्यान सलमान खानने हल्ल्यानंतर पहिली इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खानने त्याच्या जिम इक्विपमेंट ब्रँडची माहिती देणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे. सलमानने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर चाहते त्यावर काळजी व्यक्त करणाऱ्या कमेंट्स करत आहेत. अनेकांनी सलमान खानला काळजी घे, असं म्हटलं आहे. तर, काहींनी कमेंट्समध्ये लॉरेन्स बिश्नोईचा उल्लेखही केला आहे. घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सलमान खानने केलेल्या या पहिल्या व्हिडीओवर चाहते कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव करत आहेत.

घरावर गोळीबार झाल्यावर सलमान खानचा मोठा निर्णय, अभिनेत्याने सांगितलं की कोणीही आता…

‘आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो’, ‘सलमान खानची घटनेबद्दल अपडेट देण्याची पद्धत कॅज्युअल आहे’, ‘काळजी घे’, ‘लॉरेन्स बिश्नोई सलमान खानचं काहीच बिघडवू शकत नाही’, अशा प्रकारच्या कमेंट्स या व्हिडीओवर आहेत. फक्त चाहतेच नाही तर बॉलीवूड सेलिब्रिटीही या व्हिडीओवर कमेंट्स करत आहेत.

सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos

सलमान खानच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत सलमान खानशी संवाद साधला होता. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी संध्याकाळी अभिनेत्याच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan first post after firing at home galaxy apartment see video hrc