बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खानच्या अँक्शन सीन्सचा थरार पाहायला मिळत आहे. तसेच यात सलमानच्या सिक्स पॅक्स अॅब्सनेही चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र त्यावर अनेकांनी ते खोटे असल्याचा दावा केला आहे. नुकतंच एका कार्यक्रमात सलमानने यावर सडेतोड उत्तर दिले.

‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान हा त्याच्या सिक्स पॅक्स अॅब्समुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यापूर्वी सलमानने एक फोटोही पोस्ट केला होता. त्या फोटोत सलमान खानने त्याची जबरदस्त बॉडी दाखवली होती. आगामी चित्रपटाचा ट्रेलर आणि फोटोनंतर सलमानची ते सिक्स पॅक्स अॅब्स खोटे असल्याचे अनेकांनी म्हटले होते. तर काहींनी हे फोटोशॉप असल्याचा दावा केला होता. नुकतंच या सर्व चर्चांवर सलमानने भर कार्यक्रमात शर्टलेस होऊन उत्तर दिले.
आणखी वाचा : “सकाळी कुठे होता भावा…” प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याने सलमान खान ट्रोल

Priyanka Chopra adorable gesture for bhabhi video viral
Video: नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
celebrity masterchef nikki tamboli emotional breakdown after see brother photo
Video: ‘तो’ फोटो पाहताच निक्की तांबोळीच्या अश्रूंचा बांध फुटला, फराह खान समजावत म्हणाली, “तुझ्या मनात…”
Samay Raina Joke about Rekha in front of Amitabh Bachchan in kbc 16 fact check
Video: “आपके पास रेखा नहीं है”, समय रैनाने बिग बींची वैयक्तिक आयुष्यावरून उडवलेली खिल्ली? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या सत्य
Sonu Nigam
लाईव्ह शोमध्ये सोनू निगमच्या पाठीत सुरू झाल्या वेदना; व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “आयुष्यातील सर्वात कठीण…”
Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमधील अनेक व्हिडीओ सध्या समोर आले आहेत. या दरम्यानच्या एका व्हिडीओत सलमान हा त्याच्या सिक्स पॅक्स अॅब्सबद्दल बोलताना दिसत आहे. “अनेकांना माझे सिक्स पॅक्स अॅब्स फोटोशॉप आणि व्हीएफएक्सद्वारे बनवलेत असं वाटतं, पण आज मी तुम्हाला सत्य काय ते दाखवणार आहे”, असे सलमानने म्हटले. त्यानंतर तो भर कार्यक्रमात शर्टलेस झाला.

तो शर्टाची बटण उघडत असताना उपस्थितीत असलेल्या अनेकांनी टाळ्या, शिट्या वाजत त्याला प्रोत्साहन दिले. यावेळी त्याने त्याचे सिक्स पॅक्सही दाखवले. “तुम्हाला काय वाटतं हे व्हीएफएक्सद्वारे शक्य आहे का?”, असा टोलाही त्याने ट्रोलर्सला लगावला. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट

दरम्यान ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खानसह दग्गुबती व्यंकटेश, पूजा हेगडे, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल यांचीही झलक पाहायला मिळाली. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबू नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे. शहनाज गिल, जस्सी गिल आणि पलक तिवारी यांच्याही चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ईदच्या मुहुर्तावर येत्या २१ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader